कर्मचाºयांचे भीक मांगो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:54 PM2017-11-01T23:54:17+5:302017-11-01T23:54:29+5:30
महसूल विभागात २००५ नंतर रूजू झालेल्या कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करा. यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वात कर्मचाºयांनी......
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महसूल विभागात २००५ नंतर रूजू झालेल्या कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करा. यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वात कर्मचाºयांनी बुधवारी (दि.१) रोजी येथील तहसील कार्यालयासमोर भीक मांगो आंदोलन केले. कर्मचाºयांच्या या अभिनव आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वात कर्मचाºयांनी बुधवारी (दि.१) एकत्र येत येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. तसेच शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी भीक मांगो आंदोलन केले. ३० कर्मचाºयांनी यावेळी रक्तदान सुध्दा केले. महसूल विभागात २००५ नंतर रूजू झालेल्या कर्मचाºयांना जुनी पेंशन हक्क योजना लागू करण्यात यावी. शासनाने ३१ आॅक्टोबर २००५ ला कर्मचाºयांसाठी लागू केलेल्या निर्णय रद्द करावा. जुन्या पेंशन हक्क योजनेत कर्मचाºयांना पीएफची रक्कम काढण्याचे स्वातंत्र्य होते. मात्र नव्या योजनेत हे अधिकार कमी केले आहे. नवीन योजनेत कर्मचाºयांकडून ४० टक्के रक्कम खासगी विमा कंपनीत गुंतवणूक करण्यास शासनाकडून भाग पाडले जात आहे. नव्या पेंशन योजनेनुसार कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना अंदाजीत रक्कम दिली जाणार आहे. इतर कुठलाही मोबदला दिला जाणार नाही. बºयाच कर्मचाºयांचे पेंशनचे खाते नसताना त्यांच्या वेतनातून जबरदस्तीने रक्कम कपात केली जात आहे. नव्या पेंशन हक्क योजनेत कर्मचारीविरोधी अनेक बाबींचा समावेश आहे. त्यामुळे ही योजना रद्द करुन कर्मचाºयांना जुनी पेंशन हक्क योजना लागू करण्याची मागणी कर्मचाºयांनी केली आहे. महसूल कर्मचाºयांसह इतर विभागाच्या कर्मचाºयांनी सुध्दा काळ्या फिती लावून काम केले. या आंदोलनात जिल्ह्यातील ५ हजार कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला.
या आंदोलनादरम्यान रक्तदान शिबिर घेण्यात आले. ३० कर्मचाºयांनी रक्तदान केले. जिल्हा सचिव आशिष रामटेके, जिल्हा कार्याध्यक्ष राकेश डोंगरे, विदर्भ पटवारी संघटना गोंदिया उपविभागाचे अध्यक्ष राजेश बोडखे, जिल्हा सचिव विवेक बाबरे, महाराष्टÑ राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेने लिकेश हिरापुरे, राजेश मेनन, सुनील राठोड, राकेश डोंगरे, अमोल पाटणकर, लिलाधर पाथोडे, पी.जी.शहारे, राजू धांडे, विरेंद्र कटरे, एस.यु.वंजारी, हरीराम येळणे, एम.सी.चुºहे, भुषण लोहारे,चिंतामन वलथरे, सतीश दमाहे, हेमंत पटले, नितू दुर्गे, निराशा शंभरकर, ममता ठकलेले, कांताबाई साखरे आदी सहभागी झाले होते.
तो निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी
महसूल कर्मचाºयांनी त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी भीक मांगो आंदोलन केले. भीक मागून गोळा झालेली ३ हजार २२१ रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय कर्मचाºयांनी घेतला आहे.