कालीमाती देवस्थानासाठी सभागृहाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:20 AM2021-06-18T04:20:49+5:302021-06-18T04:20:49+5:30
अर्जुनी मोरगाव : काळीमाती येथील प्राचीन हनुमान देवस्थानासाठी सभागृह तयार करून देण्याची मागणी आमदार परिणय फुके यांना दिलेल्या ...
अर्जुनी मोरगाव : काळीमाती येथील प्राचीन हनुमान देवस्थानासाठी सभागृह तयार करून देण्याची मागणी आमदार परिणय फुके यांना दिलेल्या निवेदनातून केली. रामजन्मभूमी समर्पण निधी संकलन समितीने यासंदर्भात निवेदन दिले.
कालीमाती येथे प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. हे ठिकाण प्रतापगड-गोठणगाव मार्गावर असून, हे जागृत देवस्थान तालुक्यात प्रसिद्ध आहे .हनुमान जयंती, महाशिवरात्री आणि रामनवमीला भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्शन घेतात. मंदिर जंगलव्याप्त परिसरात असल्याने निसर्गरम्य वातावरणाचाही आनंद लुटतात. या मंदिरात भाविक नवस फेडणे किंवा मांगलिक कार्यानिमित्ताने भोजनदानाचे कार्यक्रम करतात. याठिकाणी मूलभूत सुविधा नसल्याने सभागृह तयार करण्यात यावे. या मागणीचे निवेदन अर्जुनी मोरगाव रामजन्मभूमी समर्पण निधी संकलन समितीने माजी मंत्री तथा विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांना दिले. यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते. आमदार फुके बुधवारी स्थानिक भाजप कार्यालयात कार्यकर्ता बैठकीत उपस्थित होते. यावेळी गिरीश बागडे, विजय कापगते, देवेंद्र गजापुरे, बळीराम हातझाडे, ओमप्रकाशसिंह पवार, धिरेन जिवानी, आनंदराव शाहारे, मधुकर दुणेदार उपस्थित होते.
===Photopath===
170621\img-20210617-wa0002.jpg
===Caption===
आ परिणय फुके यांना निवेदन देतांना रामजन्मभूमी निधी संकलन समितीचे पदाधिकारी