मांग गारुडी वस्तीसाठी सुरु झाला मदतीचा ओघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 06:00 AM2020-03-29T06:00:00+5:302020-03-29T06:00:24+5:30
देशात असलेल्या‘लॉकडाऊन’मुळे हातावर पोट असलेल्यांची चांगलीच परवड झाली आहे. शिवाय बाहेरून आलेले कित्येकजण अडकून पडल्याने त्यांच्यी फजिती झाली आहे. मात्र विविधतेत एकतेचा संदेश देणाऱ्या गोंदिया शहरात आलेला कुणीही उपाशी राहणार नाही तसेच त्याची समस्या सोडविली जाणार नाही असे कधीही झाले नाही. येथील सामाजिक कार्यकर्त्यांपासून ते विविध सामाजिक संघटना नेहमीच गरजूंच्या मदतीसाठी तत्पर असून आजच्या या कठीण समयीही अशा या संघटना व कार्यकर्ते धावून येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया : दत्तक घेतलेल्या मांग गारूडी वस्तीतील सुमारे ७० कुटुंबीयांना अडचणीत बघून येथील लायन्स क्लब गोंदिया रॉयल त्यांच्या मदतीसाठी सरसावले. वस्तीतील या कुटुंबीयांना धान्याचे वाटप करून क्लबने स्विकारलेल्या पालकत्वाचे आपले कर्तव्य पार पडल्याचे गुरूवारी (दि.२६) बघावयास मिळाले.
देशात असलेल्या‘लॉकडाऊन’मुळे हातावर पोट असलेल्यांची चांगलीच परवड झाली आहे. शिवाय बाहेरून आलेले कित्येकजण अडकून पडल्याने त्यांच्यी फजिती झाली आहे. मात्र विविधतेत एकतेचा संदेश देणाऱ्या गोंदिया शहरात आलेला कुणीही उपाशी राहणार नाही तसेच त्याची समस्या सोडविली जाणार नाही असे कधीही झाले नाही. येथील सामाजिक कार्यकर्त्यांपासून ते विविध सामाजिक संघटना नेहमीच गरजूंच्या मदतीसाठी तत्पर असून आजच्या या कठीण समयीही अशा या संघटना व कार्यकर्ते धावून येत आहेत.
लगतच्या ग्राम कुडवा येथील शिवाजीनगरात मांग गारूडी समाजाची वस्ती असून येथील सुमारे ७० कुटुंबीय हातावर पोट घेऊन चालतात. ‘लॉकडाऊन’मुळे या कुटुंबातील मोठ्यांपासून चिमुकल्यांच्याही जेवणाची समस्या निर्माण झाली आहे. मात्र त्यांच्या मदतीसाठी येथील लायन्स क्लब गोंदिया रॉयल ही संघटना धावून आली. संघटनेच्यावतीने गुरूवारी (दि.२६) वस्तीत जाऊन येथील कुटुंबांना प्रत्येकी ४ किलो तांदूळ, १ किलो डाळ, १ किलो मीठ, साबण व मास्क पाकिटांचे वाटप केले.
वस्तीचे मार्गदर्शक प्रशांत बोरसे यांच्या मार्गदर्शनात क्लबचे सदस्य राहुल अग्रवाल, प्रितेश अग्रवाल, प्रशांत वडेरा, रिक्की पृथ्यानी, शुभम अग्रवाल, शिवा अग्रवाल, विनय शाहू, सौरभ अग्रवाल, कुशल चोपडा, हरलीन होरा यांनी वस्तीतील सर्व सदस्यांना धान्याच्या पाकिटांचे वितरण केले.
सन २०१८ मध्ये वस्ती घेतली दत्तक
सर्वांच्या मुलांप्रमाणे या मांग गारूडी समाजातील मुलेही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी लायन्स क्लबने सन २०१८ मध्ये ही वस्ती दत्तक घेतली आहे. फक्त नावापुरतीच दत्तक नव्हे तर क्लबने वस्तीतील मुलांची शाळा भरविण्यासाठी दोन लाख रूपये खर्च करून पालावरची शाळा शेड तयार केले आहे.येथेच वस्तीतील मुलांची शाळा भरत आहे.क्लबकडून वस्तीत सातत्याने आरोग्य शिबिर, शैक्षणिक कार्यशाळा, कपडे वाटप, स्वातंत्र व प्रजास्ताक दिन एवढेच नव्हे तर क्लबमधील सदस्यांचे वाढदिवस व लग्नाचा वाढदिवस तसेच सर्वच सणवारही साजरा केले जात आहेत. क्लब घेतलेल्या पालकत्वाचे कर्तव्य पूर्ण जबाबदारी पार पाडत असल्याचे दिसून येत आहे.