भाजीपाला दुकानांच्या वेळेत वाढ करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:47 AM2021-05-05T04:47:52+5:302021-05-05T04:47:52+5:30
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. या महामारीला रोखण्याकरिता शासनाने १५ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत ...
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. या महामारीला रोखण्याकरिता शासनाने १५ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत किराणा व भाजीपाल्याची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहे. परंतु दारुचे दुकान हे सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येत आहे. शासनाच्या या दुहेरी धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे अनेक दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागत आहेत. यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. अशा परिस्थितीत शासनाचे अधिकारी मोक्यावर पोहोचून किराणा व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत हे उचित नाही. दरम्यान शासनाने जीवनाश्यक वस्तू विक्रीची दुकाने सुरु ठेवण्याच्या वेळेत वाढ करावी, अशी मागणी अनिल अग्रवाल यांनी केली आहे.