भारतीय आकाशदिव्यांना डिमांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 09:37 PM2018-11-05T21:37:41+5:302018-11-05T21:38:17+5:30

दिव्यांचा मंद प्रकाश व आकाशदिव्यांचा लखलखाट याशिवाय दिवाळीचा सण साजराच होऊ शकत नाही. म्हणूनच सध्या गोंदियाकरांची या साहित्यांच्या खरेदीसाठी धावपळ सुरू आहे. रंगबिरंगी वेगवेगळ््या प्रकारच्या आकाशदिव्यांनी बाजारपेठ सजलेली दिसून येत आहेत.

Demand on Indian skydays | भारतीय आकाशदिव्यांना डिमांड

भारतीय आकाशदिव्यांना डिमांड

Next
ठळक मुद्देरंगबिरंगी आकाशदिवे बाजारात : मध्यम रेंजला ग्राहकांची पसंती

कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिव्यांचा मंद प्रकाश व आकाशदिव्यांचा लखलखाट याशिवाय दिवाळीचा सण साजराच होऊ शकत नाही. म्हणूनच सध्या गोंदियाकरांची या साहित्यांच्या खरेदीसाठी धावपळ सुरू आहे. रंगबिरंगी वेगवेगळ््या प्रकारच्या आकाशदिव्यांनी बाजारपेठ सजलेली दिसून येत आहेत.
प्रकाशाच्या या सणात दिव्यांचा मान असून महालक्ष्मीच्या स्वागतासाठी घराच्या दारापासून अवघे घर प्रकाशमान केले जाते. यात दिव्यांच्या मंद प्रकाशाला आकाशदिव्यांच्या लखलखाटाची साथ महत्वाची असते. म्हणूनच दिवाळीच्या दिवशी नवीन दिवे लावण्याचा मान असतानाच त्याच्यासोबत आकाशदिवा हा हमखास लावला जातो. घराच्यासमोर प्रकाश देणारा आकाशदिवा आता घरोघरी दिसून येणार आहे. नेमकी हीच बाब हेरून विक्रेते दरवर्षी आकाशदिव्यांच्या नवनवीन व्हेरायटी ग्राहकांसाठी घेऊन येतात.
त्यानुसार यंदाही बाजारपेठ रंगबिरंगी वेगवेगळ््या प्रकारच्या आकाशदिव्यांनी सजलेली दिसून येत आहे. तर ग्राहकांची आतापासूनच खरेदीसाठी गर्दीही दिसून येत आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत चायनीज वस्तूंची चांगलीच चलती असताना आकाशदिव्यांनाही आता चायनीज ज्वर चढला होता.
भारतीय पद्धतीच्या विविध आकाशदिव्यांनी सर्वांनाच भुरळ घातली असून त्यांना चांगलीच मागणी आहे. सध्या आकाशदिव्यांतही कापडी आकाशदिवे भेटत असल्याने त्यांची चांगली मागणी दिसते.
कापडी आकाशदिवे जास्त काळ टिकतात. त्यातही विविध प्र्रकारचे आकाशदिवे आता बाजारात बघावयास मिळत आहेत. कापडी तसेच प्लास्टीक शीटपासूनचेही विविध आकाशदिवे बाजारात उपलब्ध आहेत.
२५- २५० रूपयांपर्यंतची रेंज
सध्या बाजारात २५ रूपयांपासून २५० रूपयांपर्यंतच्या आकाशदिव्यांची रेंज दिसून येत आहे. यापेक्षाही जास्त दराचे आकाशदिवे विक्रीसाठी आहेत. मात्र ग्राहक जास्त महाग आकाशदिव्यांची खरेदी न करता मध्यम रेंजच्या दिव्यांना पसंती देत असल्याचे विक्रेते सांगतात. यातही आता आकाशदिव्यांत कापडांपासून तयार केलेले दिवे बाजारात आले आहेत. कापडांचे असल्याने त्यांना स्वच्छ करून नीट ठेवल्यास पुढील वर्षीही त्यांचा वापर करता येतो. त्यामुळे कागदांच्या आकाशदिव्यांऐवजी कापडांच्या आकाशदिव्यांची खरेदी ग्राहक जास्त करीत आहे.

Web Title: Demand on Indian skydays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.