पायदळ पुलाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 11:27 PM2017-11-03T23:27:34+5:302017-11-03T23:27:50+5:30
गोंदिया ते बल्हारशा लोहमार्गावर असलेले सौंदड रेल्वे स्थानक हे ब्रिटिश कालीन आहे. चारही दिशांना प्रवास करण्यासाठी सौंदड केंद्रबिंद असल्याने येथे प्रवाशांची गर्दी असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सौंदड : गोंदिया ते बल्हारशा लोहमार्गावर असलेले सौंदड रेल्वे स्थानक हे ब्रिटिश कालीन आहे. चारही दिशांना प्रवास करण्यासाठी सौंदड केंद्रबिंद असल्याने येथे प्रवाशांची गर्दी असते. मात्र आश्चर्य व खेदाची बाब अशी की येथील रेल्वे स्थानकावर पायदळ पुल नसल्यामुळे प्रवाशांना रेल्वे रूळावरून ये-जा करावी लगते. कित्येकदा गाडी उभी असल्यास गाडीच्या खालून निघावे लागते. हा प्रकार जिवघेणा असल्यामुळे पायदळ पुलाची मागणी केली जात आहे.
येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या पूर्वीपेक्षा जास्त झाली आहे. या रेल्वे स्थानकावर पुर्व तथा पश्चिम दिशेने ये-जा करण्या करिता दोन मार्ग आहेत. महामार्गाने प्रवास करणारे अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. त्यामुळे चारही दिशांना जाण्यासाठी सौंदड हे गाव जिल्ह्याचे केंद्रबिंदू आहे. रेल्वे तथा बसने याच ठिकाणावरुन लांबचा प्रवास परिसरातील नागरिक करतात.
सौंदड रेल्वे स्थानकावर येताना प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडून यावे लागते. कित्येकदा गाडी उभी असल्यास प्रवाशांना चक्क गाडीच्या खालून निघावे लागते. अशात अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. मात्र उपाय नसल्याने लोकांना आपल जीव धोक्यात घालावा लागतो. त्यामुळे येथे पायदळ पूल तयार करण्याची मागणी होत आहे.