शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2016 01:51 AM2016-07-03T01:51:25+5:302016-07-03T01:51:25+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेने पीक कर्ज दिले नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, त्यांना पीक कर्ज देण्यात यावे.
गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेने पीक कर्ज दिले नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, त्यांना पीक कर्ज देण्यात यावे. पीक कर्ज देताना कोणत्याही अटी लादू नये, बँकाच्या कर्ज माफ करावे, अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी व गोरेगाव येथील वनहक्क अतिक्रमण धारकांना पट्टे द्यावे, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बांध व तलावाचे पाणी शेतकऱ्यांना द्यावे, पेन्शन योजना लागू करावी, खत पुरवठा करावा, वेळेत खत पुरवठा न करणाऱ्या मंडळावर कारवाई करावी, विद्युत पंपाची लाईन सुरळीत करावी, शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्यावा, विकलेल्या मालाची रक्कम ताबडतोब देण्यात यावी, नागझिरा लगत असलेल्या शेतीचे नुकसानीसाठी कुंपणाची सोय करावी, अशा विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रमोद गजभिये, वर्धा जिल्हाध्यक्ष गज्जू कुबडे, भंडाराचे जिल्हाध्यक्ष राजेश पाखमोडे, देवा धोटे, राजेश बोंबमारे, अजय लडी, प्रशांत कठाणे, अशोक सोयाम, प्रशांत मेश्राम, मन्नू भिमटे, राजेश तायवाडे, राजू अंबुले, देवा शिवणकर, प्रवेश मेश्राम, अरूण भांडारकर यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)