झाडांना रेडियमच्या लाल पट्ट्या लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:30 AM2021-05-21T04:30:10+5:302021-05-21T04:30:10+5:30
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध ते केशोरी या जिल्हा मार्गाला घनदाट जंगल असून, हा जिल्हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. ...
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध ते केशोरी या जिल्हा मार्गाला घनदाट जंगल असून, हा जिल्हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्याने रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते. या मार्गाच्या कडेला असलेल्या झाडांना रेडियमच्या लाल पट्ट्या लावणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळेस रस्ता चांगल्या पद्धतीने दिसत नाही. या रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना पट्ट्या लावल्यास अपघात टाळण्यास मदत होईल.
नवेगावबांध ते केशोरी या रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना रेडियमच्या लाल पट्ट्या लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नवेगावबांध ते केशोरी हा गोंदिया जिल्ह्याचा महत्त्वाचा मार्ग असून, गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या मार्गाने रात्रंदिवस वाहने मोठ्या प्रमाणात धावत असतात. रात्रीच्या वेळेस या रस्त्याची निश्चितता कळावी म्हणून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना चमकणाऱ्या रेडियमच्या लाल पट्ट्या लावल्यास अपघात टाळण्यास मदत होईल. या रस्त्याने वळणदार स्थळे पडत असल्यामुळे वाहन चालकांना पुढील येणारे वाहन योग्य बाजूने येत आहे, हे लक्षात यावे आणि रात्रीच्या वेळेस रस्ता फारसा दिसत नाही. रस्त्याची मर्यादा निश्चित दिसावी आणि सुरक्षित वाहतूक करता यावी यासाठी संबंधित विभागाने जातीने लक्ष देऊन नवेगावबांध ते केशोरी या मार्गावरील कडेला पडत असलेल्या झाडांना चमकणाऱ्या रेडियमच्या लालपट्ट्या लावण्याची मागणी वाहन चालकांनी तथा नागरिकांनी केली आहे.