आधारभूत खरेदी केंद्रावर मका खरेदी सुरु करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:28 AM2021-04-11T04:28:06+5:302021-04-11T04:28:06+5:30

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी, गोठणगाव, इळदा या आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत खरेदी केंद्राने खरीप हंगामातील खरेदी केलेल्या धान ...

Demand to start maize procurement at basic shopping center | आधारभूत खरेदी केंद्रावर मका खरेदी सुरु करण्याची मागणी

आधारभूत खरेदी केंद्रावर मका खरेदी सुरु करण्याची मागणी

Next

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी, गोठणगाव, इळदा या आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत खरेदी केंद्राने खरीप हंगामातील खरेदी केलेल्या धान पिकाची त्वरित उचल करुन यावर्षी शेतकऱ्यांनी घेतलेल्या उन्हाळी मका पिकाची खरेदी सुरु करावी अशी मागणी शेतकऱ्यांसह दिनेश पाटील रहांगडाले यांनी केली आहे.

दरवर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन धान उत्पन्नात कमालीची घट निर्माण होत असते. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी धान पिकाला बगल देत धान पिकाचे लागवड क्षेत्र कमी करुन त्या ठिकाणी उन्हाळी मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. उन्हाळी मका पिकाची नुकतीच मळणी आटोपून मका पीक वाळत घातले आहे. मका पिकासाठी वातावरण चांगला असल्यामुळे मका पिकाचे उत्पन्न भरघोष आले. त्यामुळे मका उत्पादक शेतकरी आनंदित असल्याचे दिसून येत आहे. मका पीक साठवणुकीच्या अभावामुळे शेतात पडली आहेत. आधारभूत केंद्रांमधून मका पिकाला प्रति क्विंटल १,८५० रुपये हमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग आधारभूत केंद्राने मका पीक खरेदी करण्याची वाट पाहत आहेत. खरीप हंगामातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली धान्य अजूनही महामंडळाच्या केंद्रावर पडून आहेत. जोपर्यंत धान्याची उचल होणार नाही तोपर्यंत मका पीक खरेदी केली जाणार नाही असा सूर महामंडळाकडून ऐकवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी काढलेली मका पीक खरेदी केली जाणार किंवा नाही अशी शेतकऱ्यांमध्ये शंका वजा भीती निर्माण झाली आहे. खासगी व्यापाऱ्यांना मका विक्रीला प्रति क्विंटल १,२०० ते १,३०० रुपयापर्यंत भाव दिला जाईल परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावी लागेल. आधारभूत धान खरेदी केंद्रावर उघड्यावर पडून असलेली धानाची उचल करुन महामंडळाने मका पिकाची खरेदी त्वरित सुरु करावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांसह दिनेश पाटील रहांगडाले यांनी केली आहे.

Web Title: Demand to start maize procurement at basic shopping center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.