मुरदाडात आठवी वर्ग सुरू करण्याची मागणी
By admin | Published: June 12, 2016 01:34 AM2016-06-12T01:34:23+5:302016-06-12T01:34:23+5:30
गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गत येत असलेल्या पूर्व माध्यमिक शाळा मुरदाडा येथे शाळा व्यवस्थापन समिती व ग्राम पंचायत समितीने वर्ग ८ सुरू करण्याचा ठराव पारीत केला.
परसवाडा : गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गत येत असलेल्या पूर्व माध्यमिक शाळा मुरदाडा येथे शाळा व्यवस्थापन समिती व ग्राम पंचायत समितीने वर्ग ८ सुरू करण्याचा ठराव पारीत केला. विद्यार्थी संख्या २३७ वर्ग ७ असून ४३ ने आठव्या वर्गात वाढ होऊन २७९ होणार आहे.
आरटीई कायद्यात वरिष्ठ प्राथमिक शाळा वर्ग चारच्या ठिकाणी पाच वर्ग व ७ च्या ठिकाणी ८ वर्ग होणे नैसर्गिक वाढ या नियमात आहे. पालक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम पंचायत व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची हमीचा ठराव दिला आहे. सदर ठराव २५ एप्रिल २०१६ ला क्र. ५ नुसार घेण्यात आला. त्याची प्रत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, वरिष्ठांना देण्यात आल्या. यात काही ठिकाणी शाळेत खासगी शाळेच्या संचालकांनी प्राथमिक शाळाच्या मुख्याध्यापकांवर अधिकाऱ्यांच्या मार्फत दबाव टाकण्याचा प्रयत्नही केला आहे. शासकीय कायद्यात अंतराची काही अट नसतानाही बळजबरीने अट टाकण्यात आली आहे.
शिक्षण विभागाने मुरदाडा शाळेला त्वरित मंजूरी द्यावी, विद्यार्थीचा शैक्षणिक नुकसान होऊ नये याची दक्षता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी. अन्यथा शाळेला कुलूप बंदचा सरपंच मंत्रीलाल जगणे, दयाराम आगाशे, अध्यक्ष लता शेंडे, रविंद्र सुलाखे, मधुकर डोंगरे, आशा व्यास, मामा पराते, प्रभा निमजे, परमानंद उपवंशी, हेमराज बिजेवार, शंकर सुलाखे व गावातील सर्व नागरिक, पालक वर्गने दिला आहे. (वार्ताहर)