राष्ट्रवादीचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 09:53 PM2018-10-03T21:53:22+5:302018-10-03T21:55:19+5:30

पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढी विरोधात बुधवारी (दि.३) येथील तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी धरणे आंदोलन केले. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार धनंजय देशमुख यांना देण्यात आले.

Demolition movement in front of Tahsil office of NCP | राष्ट्रवादीचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

राष्ट्रवादीचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढी विरोधात बुधवारी (दि.३) येथील तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी धरणे आंदोलन केले. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार धनंजय देशमुख यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते गंगाधर परशुरामकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य मनोहर चंद्रिकापुरे, तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, माजी अध्यक्ष नारायण भेंडारकर, नामदेव डोंगरवार, जि.प.सदस्य किशोर तरोणे, राकेश लंजे, चित्रलेखा मिश्रा, सुशिला हलमारे, गोवर्धन ताराम, दादा संग्रामे, सोनदास गणवीर, यशवंत गणवीर, आर.के.जांभुळकर, भोजराम रहेले, मनोहर शहारे, दीपक रहेले, अजय पाऊलझगडे, भाऊराव खोब्रागडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पेट्रोल, डिझेल गॅसची दैनंदिन होणारी दरवाढ बंद करावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शिष्यवृत्ती त्वरीत देण्यात यावी, कीडनाशकामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा करावे, झाशीनगर उपसा सिंचन योजना त्वरीत सुरु करावी, जि.प.शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्या, रोहयोयोजनेच्या कुशल कामाचा निधी त्वरीत द्यावा, शेतकऱ्यांचे शेतीचे विद्युत बिल सरसकट माफ करावे, नवीन राशन कार्ड द्यावे, वनजमीन व घराचे पट्टे त्वरीत द्यावे व गॅसधारकांना केरोसीन उपलब्ध करुन द्यावा या मागण्यांचा समावेश आहे.
केंद्र वर राज्य सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शासनाने शेतकऱ्यांना कर्जाफी दिली मात्र अद्यापही अनेक शेतकºयांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. जय जवान-जय किसानचा नारा देणारे लाल बहादूर शास्री व महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी शेतकऱ्यांच्या मोर्च्यावर अश्रूधुराचा वापर केला जातो. यावरुन सरकारचा शेतकऱ्यांविषयीचा कळवळा दिसून येतो.
शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे काम अद्याप पूर्णत्वास येऊ नये यावरुन याची प्रचिती येते. यासाठी लवकरच आपण झाशीनगर येथून संघर्ष यात्रेचे आयोजन करणार असल्याचे मत मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले. जि.प.चे गट नेते गंगाधर परशुरामकर यांनी भाजप सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचा दाखला देताना म्हणाले, यापुढे शेतकऱ्यांना आपल्या शेतात कोणते पिक घ्यायचे आहे, विंधन विहिरीचे खोदकाम करावयाचे आहे, यासाठी प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागेल. त्यावर ५ टक्के कर भरणा करावा लागेल. शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरणारा भूजल अधिनियम येणार आहे. गोंदिया जिल्ह्यात स्क्रब टायफस व साथीच्या आजाराचे थैमान असताना ५५ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. हॉपकीन नावाची लस तयार करणारी कंपनी आहे. शासनाने या कंपणीला औषधी पुरवठयाचे कंत्राट दिले. मात्र कंपनीने दोन वर्षात औषधांचा पुरवठा केलाच नाही.
शेवटी शासकीय दर कराराप्रमाणे औषधांची खरेदी करण्याचे शासनाने अधिकार दिले. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. एकंदरीत शासनाच्या या सर्व चुकीच्या धोरणामुळे शेतकरी उध्दवस्त झाला असल्याचे सांगितले. या धरणे आंदोलनाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, संचालन गोवर्धन ताराम यांनी केले. योगेश नाकाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: Demolition movement in front of Tahsil office of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.