जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

By admin | Published: April 10, 2015 01:20 AM2015-04-10T01:20:19+5:302015-04-10T01:20:19+5:30

राज्यातील ओबीसी समाजाला प्रलोभनाचे गाजर दाखवून सत्ता हाती आल्यानंतर सत्तारुढ भाजप शासनाने ओबीसी समाजावर अन्याय करणारे निर्णय घेतले.

Demonstrate in front of the Collector Office | जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

Next

गोंदिया : राज्यातील ओबीसी समाजाला प्रलोभनाचे गाजर दाखवून सत्ता हाती आल्यानंतर सत्तारुढ भाजप शासनाने ओबीसी समाजावर अन्याय करणारे निर्णय घेतले. ज्या ओबीसी समाजामुळे ते सत्तेवर आले त्याच ओबीसी समाजावरील अन्यायाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारीमार्फत राज्य शासनाला व मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात अनुसूचित जाती-जमाती प्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपये करण्यात यावे. मागील दोन वर्षांपासून विविध विषयात महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्या तात्काळ देण्यात याव्यात. ३० मार्च २०१५ रोजी काढण्यात आलेला आदेश रद्द करण्यात यावा, या मागण्यांचा समावेश होता. दुपारी १२ वाजतापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलनाला सुरुवात झाली.
याप्रसंगी गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रिकापुरे, जीवन लंजे, सुनील पटले, दुर्गा तिराले यांनी विचार व्यक्त करताना सत्तारुढ भाजप सेना सरकारच्या वतीने ओबीसी बहुसंख्य समाजाला व त्या समाजातील विद्यार्थ्यांना दाबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सात महिने होवूनही भाजपने दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही, हे निदर्शनास आणून शासनाने ३० मार्च २०१५ चा आदेश रद्द करुन ओबीसीसाठी उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये न केल्यास सरकारविरुद्ध मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा वक्त्यांनी भाषणातून दिला.
या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रिकापुरे, जीवन लंजे, अशोक सहारे, बबलू कटरे, कमलबापू बहेकार, केवल बघेले, लक्ष्मण नागपुरे, बबलू दोनोडे, गणेश बरडे, राजलक्ष्मी तुरकर, दुर्गा तिराले, केतन तुरकर, रामू चुटे, सुनील पटले, पप्पू पटले, महेंद्र चौधरी, पुरणलाल उके, बाबा बहेकार, कुलदिप रिनायत, डॉ. सुरेश कावळे, पप्पू राणे, रामकृष्ण गौतम, खुशल वैद्य, चुनेश पटले, अजय नागपुरे, होमेंद्र चौधरी, विनायक कोहळे, पंकज पटले, प्रतीक रहांगडाले, मनिष हरिणखेडे, योगेंद्र येळे, मोरेश्वर चावले, हरिष ब्राम्हणकर, विवेक चौधरी, पृथ्वीराज शिवणकर, तुकाराम बोहरे, मनोज शरणागत, अशोक बघेले, सी.जी. कुरैशी, आनंद रहांगडाले, प्रितम चौधरी, लिखिराम दमाहे, सोनू येडे, सुरजलाल दमाहे, मंगल दमाहे, कान्ही बघेले, संतोष नागपुरे, अभिषेक चुटे, संतोष रहांगडाले, आशिष चव्हाण, रवी बडवाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Demonstrate in front of the Collector Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.