यंत्राने भात लागवड प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 09:24 PM2019-08-12T21:24:18+5:302019-08-12T21:26:29+5:30
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने तालुक्यातील ग्राम झालीया या गावात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत यंत्राच्या सहायाने भात लागवड प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यांंतर्गत गावातील २५ शेतकऱ्यांची गट प्रात्यक्षिक राबविण्याकरिता निवड करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने तालुक्यातील ग्राम झालीया या गावात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत यंत्राच्या सहायाने भात लागवड प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यांंतर्गत गावातील २५ शेतकऱ्यांची गट प्रात्यक्षिक राबविण्याकरिता निवड करण्यात आली आहे. पीक प्रात्यक्षिकाकरिता निवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रथम यंत्राद्वारे धान लागवडीकरिता मशिनच्या ट्रेच्या आकाराची भात नर्सरी करिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन त्या प्रकारची मॅट नर्सरी तयार करण्यात आली.
सदर प्रात्यक्षिक योग्यरित्या राबविण्याकरिता कृषी सहायक टी.एस. तुरकर यांनी प्रयत्न करुन शेतकºयांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्या अनुशंगाने शुक्रवारी (दि.९) शालीकराम चुन्नीलाल बिसेन यांच्या शेतावर यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिक प्रत्यक्ष कृतीद्वारे करुन दाखविण्यात आले.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रात्यक्षिक करण्यात आले.
सदर प्रात्यक्षिकाबाबत तोडसाम यांनी शेतकºयांशी चर्चा केली व त्यांना यंत्राद्वारे लागवडीचे तंत्र तसेच होणारे फायदे विषयी मार्गदर्शन केले.
विशेष म्हणजे, मजुरांच्या अभावामुळे लागवडीस होणाऱ्या विलंब यामुळे टाळता येणे शक्य आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच योग्य वेळेत लागवड झाल्यास पीक वाढीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते. यामुळे पीक उत्पादनात भरीव वाढ होते.
यंत्राद्वारे एका दिवसात चार ते पाच एक क्षेत्रावर लागवड करता येणे शक्य आहे असेही सांगीतले. यावेळी कृषी पर्यवेक्षक डी.व्ही. ठाकरे, कृषी सहायक टी.एस. तुरकर, आर.आर. भगत, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक ए.एस. उपवंशी, कृषी सेवक एस.एम. बिसेन यांच्यासह शेतकरी प्रदीप भगत, मनोज दमाहे, विजय पटले, मनोज बनोठे, सुरजलाल कुराहे, संतोष बल्हारे, प्रकाश दमाहे, गादीप्रसाद भगत, प्रकाश शेंडे, संतोष बिसेन, खिलेश्वर दमाहे, अशोक शेंडे, जितेंद्र शरणागत, सुखराम हटवार आदी शेतकरी उपस्थित होते.