डेंग्यूने घेतला आणखी एका मुलीचा बळी?
By admin | Published: September 9, 2014 12:27 AM2014-09-09T00:27:18+5:302014-09-09T00:27:18+5:30
गोंडमोहाळी ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या किंडगीपार येथील विद्या विनोद सादेपाच (१४) या मुलीचा गोंदिया येथील बजाज रुग्णालयात सोमवारी सकाळी ८ वाजता मृत्यू झाला. तिचा मृत्यू डेंग्युमुळे
घाणीचे साम्राज्य : ग्रामपंचायतचे दुर्लक्ष
परसवाडा : गोंडमोहाळी ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या किंडगीपार येथील विद्या विनोद सादेपाच (१४) या मुलीचा गोंदिया येथील बजाज रुग्णालयात सोमवारी सकाळी ८ वाजता मृत्यू झाला. तिचा मृत्यू डेंग्युमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र त्याबाबतचा अहवाल अद्याप मिळालेला नाही.
प्राप्त माहितीनुसार, विद्या विनोद सादेपाच हिची प्रकृती चार दिवसाअगोदर बिघडली होती. गावातील डॉक्टरकडून उपचार केले पण सुधारणा झाली नाही. तिरोडा येथील डॉ.मेश्राम यांच्या रुग्णालयात नेले असता त्यांनी प्राथमिक उपचार करुन डॉ.बजाजकडे नेण्याचा सल्ला दिला. सोमवारी (दि.८) गोंदिया येथे नेले असता सकाळी ८ वाजता मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६ सप्टेंबरला सुकेसना कन्हैयालाल बघेले (३५) या महिलेचाही डेंग्यूने मृत्यू झाला होता.
इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्र गोंडमोहाळी अंतर्गत किंडगीपार गाव येत असून गावात स्वच्छता ठेवण्याबाबत ग्रामपंचायतीला कळविण्यात आले. आमची चमू १५ दिवस, आठ दिवसात गावाची तपासणी करते. त्यावेळी गावात रुग्ण नव्हते. सदर मुलीचा रक्ताचा नमुना आमच्याकडे नाही. मुलगी ८ वीची विद्यार्थिनी असून शाळेत दररोज जात असे. शाळेतही तपासणी केली जाते व आमची पुन्हा संपूर्ण गावात घरोघरी जाऊन प्रत्येकाचे रक्ताचे नमूने घेत आहे. आतापर्यंत डेंग्यू पॉझीटिव्ह रिपोर्ट आला नाही. रक्ताचे नमूने पुन्हा पाठविले आहे. सध्या केवळ ते संशयित आहेत. गावातील नागरिकांच्या घरीच दुषित पाणी व घाण असल्याने आजार वाढत असल्याचे इंदोरा बुज.प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. आर. आईटवार यांनी सांगितले. ६ सप्टेंबरला सुकेसना बघेले या महिलेचा मृत्यू झाला, पण रिपोर्ट न आल्याने तो मृत्यू डेंग्युनेच झाला की नाही, हे सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले. (वार्ताहर)