देवरी ग्रामीण रुग्णालयाचे जर्जर छत कोसळले

By admin | Published: September 25, 2016 02:26 AM2016-09-25T02:26:48+5:302016-09-25T02:26:48+5:30

गेल्या ३५ वर्षापूर्वी बनविण्यात आलेली देवरी ग्रामीण रूग्णालयाची इमारत मेटनेन्सच्या अभावामुळे पूर्णत: जर्जर झाली आहे.

Deori rural hospital's dilapidated roof collapsed | देवरी ग्रामीण रुग्णालयाचे जर्जर छत कोसळले

देवरी ग्रामीण रुग्णालयाचे जर्जर छत कोसळले

Next

जीवित हानी टळली : जर्जर इमारतीमुळे नवीन इमारतीची मागणी
देवरी : गेल्या ३५ वर्षापूर्वी बनविण्यात आलेली देवरी ग्रामीण रूग्णालयाची इमारत मेटनेन्सच्या अभावामुळे पूर्णत: जर्जर झाली आहे. या इमारतीचे प्रयोगशाळेच्या बाजुकडील बाथरुमवरील छत शुक्रवारला दुपारी कोसळले. यावेळी त्या ठिकाणी कोणीही नसल्याने जीवित हानी टळली. मात्र या इमारतीमधील दुर्लक्षितपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.
विशेष म्हणजे तालुक्याच्यास्थळी ग्रामीण रुग्णालय असून ४० खाटांचे हे रुग्णालय बऱ्याच वर्षापासून बनलेले आहे. अधिकारी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इमारत कोसळण्याच्या मार्गावर आलेली आहे. जीव मुठीत घेऊन रुग्ण येथे उपचार घेत असतात. पावसाळ्यात तर समस्या अजूनच गंभीर असते. इमारतीचे छत पूर्णत: जर्जर झाल्याने जागोजागी पाणी गळत असते. काही ठिकाणी तर मोठमोठ्या प्लास्टीक लावून छताचे पाणी अडवल्या जात आहे.
या व्यतिरिक्त पाण्याची भिषण समस्या असल्याने रुग्णांना पिण्यासाठी व बाथरुमकरिता घरुन पाणी आणावे लागत आहे. डॉक्टरांचा अभाव, औषधीसाठ्याची कमतरता अशा विविध समस्यांकडे असलेल्या या रुग्णालयात उपचार कसा घ्यायचा हा प्रश्न रुग्णांना पडलेला आहे.
जर्जर झालेल्या इमारतीचा प्रश्न आरोग्यमंत्र्याकडे आमदार संजय पुराम यांनी अनेक वेळा मांडला.परंतु अजुनपर्यंत हा प्रश्न मार्गी लागला नाही. इमारतीमुळे केव्हाही मोठा धोका होऊ शकतो.
देवरी ग्रामीण रुग्णालयाकरिता नवीन इमारत मंजूर करुन घेण्यात यावी याकरिता ६ सप्टेंबर २०१६ रोजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची भेट घेऊन आमदार पुराम यांनी ही समस्या मंत्र्यासमोर मांडली. लवकरच इमारतीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आ.पुराम यांनी सांगितले.(तालुका (प्रतिनिधी)

Web Title: Deori rural hospital's dilapidated roof collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.