विभागीय अधिकाऱ्यांना साधला शेतकऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:34 AM2021-09-04T04:34:41+5:302021-09-04T04:34:41+5:30
गोळघाटे यांचा आमगाव येथे शासकीय नियोजित दौरा होता व तेथे जात असताना त्यांची नजर येथील कृषी सहायक कार्यालयावर पडली. ...
गोळघाटे यांचा आमगाव येथे शासकीय नियोजित दौरा होता व तेथे जात असताना त्यांची नजर येथील कृषी सहायक कार्यालयावर पडली. लगेच त्यांनी येथे कार्यरत कृषी सहायक राजशेखर राणे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला व परतीत कार्यालयाला भेट देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार,परतीच्या वेळी त्यांनी कार्यालयाला भेट दिली. यावेळी राणे व बरेच शेतकरी उपस्थित होते. या भेटीत गोळघाटे यांनी शेतकऱ्यांना शासकीय योजना, आधुनिक पद्धतीने शेती, फळबाग, फुल शेती, भाजीपाला उत्पादन तसेच पिकांची फेरपालट याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरपंच कृष्णा ठलाल, प्रगतिशील शेतकरी मोहन तवाडे, रमेश ईळपाते, गोपाल जमदाळ, विश्वनाथ तरोणे, विलास वटी, टेकचंद चुटे, शुभम मेश्राम, शंकर चुटे उपस्थित होते.