दिव्यांगांचा ५ टक्के निधी त्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:20 AM2021-06-29T04:20:10+5:302021-06-29T04:20:10+5:30

त्यामुळे दिव्यांग खात्यात निधी त्वरित जमा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. देशात कोरोना महामारीचे ...

Deposit 5% of the disabled funds in their bank account immediately | दिव्यांगांचा ५ टक्के निधी त्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करा

दिव्यांगांचा ५ टक्के निधी त्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करा

Next

त्यामुळे दिव्यांग खात्यात निधी त्वरित जमा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. देशात कोरोना महामारीचे संकट निर्माण झालेले आहे. यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यात दिव्यांगांना समस्यांना समोर जावे लागत आहे. शासनाच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील ५ टक्के निधी देण्याच्या सूचना आहेत; परंतु स्थानिक स्वराज्य संस्था याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दिव्यांगांसाठी राखीव असलेला ५ टक्के निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये त्वरित जमा करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी देवरी तालुकाप्रमुख सुनील मिश्रा, शहरप्रमुख राजा भाटिया, उपशहरप्रमुख महेश फुन्ने, महिला आघाडी देवरी तालुका संघटिका प्रीती उईके, तालुका उपसंघटिका इंजि. प्रीती नेताम, तसेच नेवरगडे, सचिन भांडारकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Deposit 5% of the disabled funds in their bank account immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.