आदर्श गावांसाठी हवे ग्रामस्थांचे सहकार्य!
By admin | Published: March 8, 2017 01:06 AM2017-03-08T01:06:55+5:302017-03-08T01:06:55+5:30
मागील एका वर्षात कनेरी/राम येथे अनेक विकास कामे करण्यात आली. गावात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उघडण्यात येणार आहे.
राजकुमार बडोले : कनेरी/राम येथे रस्ता बांधकामाचे भूमीपूजन
गोंदिया : मागील एका वर्षात कनेरी/राम येथे अनेक विकास कामे करण्यात आली. गावात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उघडण्यात येणार आहे. बचतगटाच्या माध्यमातून गावातील महिलांना सक्षम करण्यात येणार असून बेरोजगार युवक एकत्र आले तर त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून स्वावलंबी करण्यात येईल. कनेरीला आदर्श गाव म्हणून त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
५ मार्च रोजी सडक/अर्जुनी तालुक्यातील आमदार आदर्श गाव योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या कनेरी/राम येथील रस्ता बांधकामच्या भूमीपूजनाप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते लेखाशिर्ष २५१५ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या ९ सिमेंट रस्त्याच्या कामाचे आणि जनसुविधा अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या स्मशानभूमी रस्ता, चावडी व बोअरवेलच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी पं.स.सभापती कविता रंगारी, प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य माधुरी पातोडे, पं.स.सदस्य राजेश कठाणे, गिरीधारी हत्तीमारे, सरपंच इंदू मेंढे, उपसरपंच प्रेमलाल मेंढे, पोलीस पाटील उमेश तिवाडे, माजी सरपंच सीताराम पाऊलझगडे, आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत धनगाये, नायब तहसिलदार अखील मेश्राम, तालुका भाजपाध्यक्ष विजय बिसेन, राहुल जोशी, जयंत शुक्ला, कृषी उत्पन्न बाजार समतिीचे संचालक वसंत गहाणे, उपविभागीय अभियंता दिलीप देशमुख, सा.बा.विभागाचे उपअभियंता अगडे, परमानंद बडोले, चेतन वडगाये उपस्थित होते.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल. सिंचनासाठी शेतकऱ्यांंना वीज कनेक्शन देण्यात येईल. कनेरीला डासमुक्त करण्यासाठी १४ व्या वित्तआयोगाच्या निधीतून शोषखड्डे तयार करण्यात येतील. सडक/अर्जुनी येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरु करण्यात येईल. सहकारी संस्थेला गोदाम बांधण्यासाठी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जि.प. सदस्य माधुरी पातोडे म्हणाल्या, ह्या गावातील नाल्या, रस्त्यांच्या विकासाबरोबर येथील लोकांना विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पूर्वी या गावात विकासाची कामे होत नव्हती पालकमंत्री यांनी या गावाला आदर्श करण्यासाठी दत्तक घेतल्यामुळे अनेक कामे आता होत आहेत. गावात विविध सामाजिक उपक्र म राबवून खऱ्या अर्थाने गावाला आदर्श बनवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाला कनेरी/राम येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची, ग्रामस्थांची मोठ्या संख्येत उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)