सडक-अर्जुनीच्या विकासाकरिता कटीबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:22 AM2018-08-18T00:22:24+5:302018-08-18T00:22:47+5:30

सडक-अर्जुनी हे माझे क्षेत्र असल्यामुळे माझ्या क्षेत्राचा विकास व्हावा असे मला वाटते. परंतु नगर पंचायतमध्ये गटबाजीचे राजकारण सोडून विकास कामाकरिता सर्वांनी एकत्र यावे. असे झाल्यास सडक-अर्जुनी नगर पंचायतच्या विकासाकरिता मी कटिबद्ध राहील,

Designed for the development of road-Arjuni | सडक-अर्जुनीच्या विकासाकरिता कटीबद्ध

सडक-अर्जुनीच्या विकासाकरिता कटीबद्ध

Next
ठळक मुद्देराजकुमार बडोले : विविध कामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : सडक-अर्जुनी हे माझे क्षेत्र असल्यामुळे माझ्या क्षेत्राचा विकास व्हावा असे मला वाटते. परंतु नगर पंचायतमध्ये गटबाजीचे राजकारण सोडून विकास कामाकरिता सर्वांनी एकत्र यावे. असे झाल्यास सडक-अर्जुनी नगर पंचायतच्या विकासाकरिता मी कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सडक-अर्जुनी नगर पंचायतच्या वतीने विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा, रमाई आवास योजना, धनादेश वितरण सोहळा, अंगणवाडी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप असे विविध कार्यक्रम मंगळवारी पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार मधुकर कुकडे होते. यावेळी सडक-अर्जुनी नगर पंचायतचे अध्यक्ष देवचंद तरोणे, उपाध्यक्ष अभय राऊत, बांधकाम सभापती रेहान शेख, गटनेता दिनेशकुमार अग्रवाल, नगरसेवक शशीकला टेंभुर्णे, बाबादास येरोला, जिजा पटोले, कविता पात्रे, मोहनकुमार शर्मा, तारा मडावी, शिला प्रधान, मुख्याधिकारी अखिलभारत मेश्राम, शेषराव गिºहेपुंजे, मनोहर चंद्रिकापुरे उपस्थित होते. बडोले यांनी, नगर पंचायत हेवेदावे सोडून विकास कामे करीत असल्यास ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यास तयार असल्याचे सांगीतले. कुकडे यांनी, नगर पंचायतच्या नियोजनामध्ये विकास कामांना प्राधान्य देत सर्वात आधी नगर पंचायत इमारतीचे बांधकाम करण्याचा सल्ला दिला. प्रास्ताविक मुख्याधिकारी अखिलभारत मेश्राम यांनी मांडले. नगराध्यक्ष देवचंद तरोणे, शेषराव गिऱ्हेपुंजे यांनी या वेळी मार्गदर्शन केले. संचालन करून आभार बिरला गणवीर यांनी मानले.

Web Title: Designed for the development of road-Arjuni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.