घरात राहूनही अख्ख्या कुटुंबाने केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:37 AM2021-04-30T04:37:35+5:302021-04-30T04:37:35+5:30
गोंदिया : कोरोनाचे नाव घेताच अंगावर शहारे येतात; परंतु एखाद्या अख्ख्या कुटुंबालाच कोरोनाचा विळखा घातला असेल तर त्या कुटुंबासमोर ...
गोंदिया : कोरोनाचे नाव घेताच अंगावर शहारे येतात; परंतु एखाद्या अख्ख्या कुटुंबालाच कोरोनाचा विळखा घातला असेल तर त्या कुटुंबासमोर किती मोठा प्रसंग ओढावेल. परंतु, अख्ख्या कुटुंबाला कोरोना होऊनही घरीच नियमांचे पालन करून साखरीटोला येथील कुटुंबाने कोरोनावर मात केली. कोरोनाचा सामना कसा करावा यासंदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले. घरात एकत्र राहूनही मास्क न काढणाऱ्या निखारे कुटुंबीयांनी गृहविलगीकरणातच राहून कोरोनाला हरविले आहे. सकाळ संध्याकाळ गरम वाफा घेणे, गरम पाण्याचा वापर करणे, दोन्ही वेळ काढ्याचा वापर करणे, संकरित आहार घेणे यावरच त्यांनी दीनचर्या कायम ठेवून कोरोनावर मात केली आहे.
.......
कोरोनावर मात कशी करायची यावर झालेल्या समाजजागृतीचा फायदा आपल्याला झाला. कोरोनावर मात करण्यासाठी गरम पाण्याचे सेवन, काढा पिणे, वाफा घेणे, फिजिकल डिस्टन्स ठेवणे, कोरोनासंदर्भात घालून दिलेल्या सर्वच नियमांचे पालन घरातील सर्वांनी काटेकोरपणाने केल्यामुळे कोरोनावर आम्ही मात करू शकलो.
अजय निखारे, साखरीटोला.
...................
घरात राहून घरातील लोकही एकमेकांच्या संपर्कात आलो नाही. घरातील लोकांना कामे वाटून देण्यात आली होती. घरातील कामे घरातच राहून प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडत कोरोनावर आळा घालण्यासाठी आपली खबरदारी घेतली. गरम पाण्यापासून काढा व गरज पडल्यास औषधांचेही सेवन घरीच केले.
-दीक्षा निखारे, साखरीटोला
..............................
कोरोनावर मात करण्यासाठी गरम वस्तू, ताज्या वस्तूचा वापर करण्यात आला. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आम्ही फळांचा जास्तीत जास्त वापर केला. एखादे साहित्य बाहेरून आणायचे असेल तर मित्र किंवा नातेवाईक घराच्या गेटपर्यंत आणून देत होते. ते मग आम्ही आतमध्ये घेऊन घरातच राहून आपले आरोग्य सुदृढ ठेवण्याकडे लक्ष दिले.
ताराचंद निखारे, साखरीटोला.
............
कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर आपली काळजी आणखीणच हिरहिरे घेऊ लागलो. खानपान व्यवस्थित ठेवून, योगा करणे, गरम पाणी पिणे, काढा पिणे, फळांचे सेवन करून नियमित साबणाने हात धुणे, घरात असतानाही तोंडाला मास्क लावण्याचे काम केले.
-अश्विनी निखारे
.........
वयाबरोबर कोरोनामुळे अधिकच चिंता होती. मात्र, कोरोना झाल्याची माहिती कळताच सर्व काळजी घरी घेण्यास सुरुवात केली. घरातील लोकांनीही आपापली काळजी घेतली. आहारापासून व्यवहारापर्यंच्या सर्व गोष्टी आम्ही घरातच राहून पाळल्या. त्यामुळे कोरोनावर मात करता आली.
-इंदिरा निखारे (नंदनावार)