मृगाच्या पाण्याने धानपीक नष्ट

By Admin | Published: June 22, 2015 12:38 AM2015-06-22T00:38:01+5:302015-06-22T00:38:01+5:30

मळणीयोग्य धान कापून शेतात ठेवले असता मृगाच्या पावसाने हजेरी लावली.

Destroy the paddy pipe with the water of the dead body | मृगाच्या पाण्याने धानपीक नष्ट

मृगाच्या पाण्याने धानपीक नष्ट

googlenewsNext

नुकसान भरपाईची मागणी : बपेरा (आ.) येथील शेतकरी हवालदिल
उसर्रा : मळणीयोग्य धान कापून शेतात ठेवले असता मृगाच्या पावसाने हजेरी लावली. यात गोवर्धन दमाहे यांच्या तीन एकर शेतातील धान सापडल्याने ते खराब झाले.
बपेरा येथील गोवर्धन दमाहे यांच्या तीन एकरातील शेतात कापणीनंतर ठेवण्यात आलेले धानाला मृग नक्षत्राच्या पावसाने पूर्णत: झोडपले आहे.
धानपिके पाण्याखाली सापडले असून आता धान पीक बाहेर काढण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आधीच मजुरांचा अभाव असल्याने शेतकरी संकटात पडला आहे. तीन एकरातील धान पीक गेल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.
शासनाने नुकसानभरपाई व कर्जमाफी द्यावी, अशी मागणी दहामे यांनी केली आहे. तसेच उसर्रा परिसरात अनेक गावांत मृगाच्या पाण्याचा धानपिके वाहून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिसराचे सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. (वार्ताहर)

Web Title: Destroy the paddy pipe with the water of the dead body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.