उत्तम सेवा मिळण्यासाठी रेल्वे समितीचा निर्धार

By admin | Published: June 17, 2016 02:12 AM2016-06-17T02:12:37+5:302016-06-17T02:12:37+5:30

आमगाव रेल्वे स्थानक व्यवसायीक दृष्टीकोनातून महत्वपूर्ण स्थानक आहे. तीन राज्यातील व्यवसायीक आवागमनाद्वारे रेल्वेला लाभ मिळत आहे.

Determination of the Railway Committee to get better service | उत्तम सेवा मिळण्यासाठी रेल्वे समितीचा निर्धार

उत्तम सेवा मिळण्यासाठी रेल्वे समितीचा निर्धार

Next

रेल्वे परिसर दुरुस्तीसह सुविधांचा प्रस्ताव: नवीन प्रवासी गाड्यांची मागणी
आमगाव : आमगाव रेल्वे स्थानक व्यवसायीक दृष्टीकोनातून महत्वपूर्ण स्थानक आहे. तीन राज्यातील व्यवसायीक आवागमनाद्वारे रेल्वेला लाभ मिळत आहे. तर प्रवाशांना प्रवासासाठी सोईस्कर म्हणून हे रेल्वे स्थानक ओळखले जाते. या रेल्वे स्थानकात सुविधांची वाढ व्हावी याकरिता रेल्वे समितीने पहिल्याच बैठकीत रेल्वे प्रशासनाला साकडे घातले आहे.
तीन राज्यातील नागरिकांना व्यवसायीक व प्रवाशाची सोय आमगाव स्थानकात व्हावी यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यात मध्य रेल्वे आमगाव स्थानक सल्लागार समितीने आयोजित बैठकीत विविध सुविधा व समस्यांच्या संदर्भात प्रस्ताव रेल्वे प्रशसनाला सादर केले. सदर मध्य रेल्वे आमगाव सल्लागार समितीची बैठक रेल्वे विभागाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली. आयोजित बैठकीत रेल्वे स्थानक प्रबंधक पलास विश्वास, समितीचे जगदीश शर्मा, यशवंत मानकर, पुरुषोत्तम सोमवंशी, नरेंद्र बाजपेई, कमलेश चुटे, अर्चना चिंचाळकर, विनय अग्रवाल, राजकुमार मोदी, चंपालाल भुतडा उपस्थित होते.
आयोजित बैठकीत रेल्वे प्रवाशांना दुपारी मध्यकाळात सात ते आठ तासांपर्यंत नागपूर ते रायपूर व रायपूर ते नागपूर पर्यंत प्रवाशी गाड्या उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. याकरिता रेल्वे प्रशासनाने या स्थानकावर दुपारी मध्यकाळात रेल्वे प्रवासी गाडी उपलब्ध करुन दयावे, रेल्वेस्थानक परिसरात महिला स्वच्छता गृहाची निर्मिती, प्लेटफार्म तीन व चारमध्ये थंड पिण्याच्या पाण्याची सोय करने, टिकीट काऊंटरवर होणारी गर्दीॅ टाळण्याकरिता दोन खिडकी उपलब्ध करने, सायकल स्टँडवर दरपत्रक लावणे, रेल्वे प्रवासी गाड्यांची माहिती संभाषण संयंत्र व डिस्प्ले कायम सुरु ठेवणे, प्लेटफार्म एक ते पाचपर्यंत पैदल पूल निर्मिती करने, प्लेटफार्म तीन व चार मध्ये वीजेची सोय करने, रेल्वे बाह्य रस्त्यांचे बांधकाम करने, स्वच्छतागृहांची देखरेख नियमित करने, रेल्वे परिसरात वृक्ष लागवड व सौंदर्यीकरण करने याबाबतीत ठराव संमत करुन रेल्वे विभागाला पाठविण्यात आले.
रेल्वे समितीने रेल्वे स्थानकातील समस्या व सुविधा प्रभावीपणे पूर्ण करण्याकरिता निर्धार केला. आयोजित बैठकीचे संचालन शर्मा यांनी केले. आभार स्थानक प्रबंधक विश्वास यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Determination of the Railway Committee to get better service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.