दर्जेदार शिक्षण देऊन सुसंस्कृत विद्यार्थी घडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 08:06 PM2018-12-25T20:06:27+5:302018-12-25T20:06:49+5:30

येथील शहीद जान्या-तिम्या जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा प्राप्त झाला आहे. शिक्षकांनी या शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देवून सुसंस्कृत विद्यार्थी घडवावेत असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

Developing cultured students with quality education | दर्जेदार शिक्षण देऊन सुसंस्कृत विद्यार्थी घडवा

दर्जेदार शिक्षण देऊन सुसंस्कृत विद्यार्थी घडवा

Next
ठळक मुद्देराजकुमार बडोले : शहीद जान्या-तिम्या जि.प. आंतरराष्ट्रीय शाळेचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : येथील शहीद जान्या-तिम्या जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा प्राप्त झाला आहे. शिक्षकांनी या शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देवून सुसंस्कृत विद्यार्थी घडवावेत असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
येथील शहीद जान्या-तिम्या जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेच्या मंगळवारी (दि.२५) आयोजीत लोकार्पण सोहळ््यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार विजय रहांगडाले होते. यावेळी जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, पं.स.सभापती माधुरी टेंभरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हाश्मी प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना नामदार बडोले यांनी, राज्यातील १३ शाळांची आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवड करण्यात आली असून त्यामध्ये येथील शहीद जान्या-तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा समावेश आहे. ही गोंदिया जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन आता बदललेला असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे शिक्षण दिले पाहिजे. या शाळेतील शिक्षण हे मराठी मातृभाषेतून होणार आहे. देशाला उत्तम योगदान देणारे विद्यार्थी या शाळेतून घडविण्यात यावे. या शाळेत भौतिक सुविधांचा अभाव असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर करण्यात येईल, त्याकरीता प्रस्ताव पाठविण्यात यावा असे त्यांनी सांगितले.
डोंगरे यांनी, आजचे विद्यार्थी हे उद्याचे देशाचे भवितव्य आहेत. विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास होणेगरजेचे आहे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, कारण शिक्षणामुळे माणूस घडत असतो. या शाळेत भौतिक सुविधांचा अभाव असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर करु न दयावा अशी अपेक्षा त्यांनी
यावेळी व्यक्त केली. आमदार रहांगडाले यांनी, विद्यार्थ्यांना या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी शिक्षकांची मानिसकता असली पाहिजे. शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी शिक्षणामध्ये परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाने दर्जेदार शिक्षण देवून चांगले विद्यार्थी घडवावेत असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकातून शिक्षणाधिकारी नरड यांनी, राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण
मिळावे यासाठी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, शालेय शिक्षण विभागाच्या शाळांमधून राज्यातील १३ शाळांमध्ये पहिल्या टप्प्यात हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध करणारा हा शिक्षणक्र म तयार करण्यात आला आहे असे सांगितले. कार्यक्र माला तिरोडा उपविभागीय अधिकारी जी.एम. तळपाडे, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, गटविकास अधिकारी रोहिणी बनकर, उपशिक्षणाधिकारी मांढरे, गटशिक्षणाधिकारी महेंद्र लांडे, पं.स. उपसभापती सुरेश रहांगडाले, जि.प. सदस्य पुष्पराज जनबंधू, माजी सभापती दिलीप चौधरी, रेखलाल टेंभरे, लक्ष्मण भगत, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चव्हाण यांच्यासह परिसरातील नागरिक, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
संचालन एम.बी.शेख यांनी केले. आभार शहीद जान्या-तिम्या जि.प.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र बिसेन यांनी मानले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजीटल शुभारंभ
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांतर्गत राज्यातील १३ भारतरत्न अटलिबहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजीटल पद्धतीने शुभारंभ करण्यात आला. त्या कार्यक्र माचे थेट प्रक्षेपण यावेळी दाखिवण्यात आले.

Web Title: Developing cultured students with quality education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.