रस्त्यांवरुन विकास धावतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 09:45 PM2018-09-17T21:45:03+5:302018-09-17T21:45:21+5:30

मागील ६० वर्षात या क्षेत्राचा विकास झाला नाही. मात्र मागील ४ वर्षात लोकसभा क्षेत्राकरिता १२ हजार ७४६ कोटी मंजूर करुन विकास कामे करण्यात जे यश आले त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा मोलाचा वाटा आहे.

Development runs from the roads | रस्त्यांवरुन विकास धावतो

रस्त्यांवरुन विकास धावतो

Next
ठळक मुद्देअशोक नेते : २८० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग कामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : मागील ६० वर्षात या क्षेत्राचा विकास झाला नाही. मात्र मागील ४ वर्षात लोकसभा क्षेत्राकरिता १२ हजार ७४६ कोटी मंजूर करुन विकास कामे करण्यात जे यश आले त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा मोलाचा वाटा आहे.
रस्त्यांवरुनच त्या परिसराच्या विकासाची कल्पना केली जाते तसेच रस्त्यावरुन विकास धावतो. यासाठी या २८० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग बांधकामाचे भूमिपूजन होत असल्याचे प्रतिपादन खा.अशोक नेते यांनी येथे केले. आमगाव-देवरी महामार्ग ५४३ चे भूमिपूजन कार्यक्रम येथील अग्रसेन चौकात आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय पुराम, जि.प.उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, माजी आ.केशव मानकर, भेरसिंह नागपुरे, पं.स.सभापती सुनंदा बहेकार, नगराध्यक्षा कौशल्या कुंभरे, उपाध्यक्ष नगर पंचायत आफताब शेख, जिल्हा संघटन मंत्री विरेंद्र अंजनकर, तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, तालुकाध्यक्ष परसराम फुंडे, उपसभापती गणेश सोनबोईर, बाबुराव कोहळे, शांतीलाल जैन उपस्थित होते.
नेते म्हणाले, ७२० कि.मी. क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारा मी एकमेव खासदार असून संपूर्ण क्षेत्रात या ४ वर्षात बरीच विकास कामे झाली असल्याचे सांगितले. पुराम म्हणाले, संपूर्ण देशात भाजपचे काम प्रशंसनीय असून देशातील भ्रष्टाचार संपलेला आहे. विकासाचे दुसरे नाव म्हणजे नरेंद्र मोदी आहे.
प्रास्ताविकातून अंजनकर यांनी देवरी ते आमगाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४३ हे ३८ कि.मी. महामार्ग २८० कोटी रुपयाचे असल्याचे सांगितले. या वेळी एम.बी. पाटील कंस्ट्रक्शन लिमिटेड पुणेचे संचालक अनुप अग्रवाल व प्रकल्प व्यवस्थापक शालीवान सुरवसे यांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून नेते व पुराम यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन कुलदीप लांजेवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार यादोराव पंचमवार यांनी मानले.

Web Title: Development runs from the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.