पाच कोटी रुपयांची विकास कामे मंजूर
By admin | Published: June 30, 2016 01:48 AM2016-06-30T01:48:26+5:302016-06-30T01:48:26+5:30
गोंदिया विधानसभा क्षेत्रात प्रधानमंत्री-मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पाच कोटी खर्चाच्या मार्गांचे बांधकाम, डांबरीकरण व नूतनीकरणाच्या कामांना मंजुरी देण्यात आली.
गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रात प्रधानमंत्री-मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पाच कोटी खर्चाच्या मार्गांचे बांधकाम, डांबरीकरण व नूतनीकरणाच्या कामांना मंजुरी देण्यात आली.
सदर निधीतून नागराच्या कटंगटोला-चांदनीटोला-नवाटोलापर्यंत पाच किमीच्या मार्गाचे चौपदरीकरण व डांबरीकरणाचे काम करण्यात येईल. तसेच उर्वरित २९३ लाख रूपयांच्या खर्चाचे छोटा गोंदिया ते चुलोद-गुदमा-दतोरापर्यंत सहा किमीच्या मार्गाचे चौपरीकरण व डांबरीकरणाचे काम करण्यात येईल. सदर कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पावसाळा संपल्यानंतर आॅक्टोबर २०१६ मध्ये सदर मार्गांचे बांधकाम करण्याचे ठरविण्यात आले आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रात ग्रामीण रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी व विकास कार्यांना गती दिल्यामुळे पं.स. सभापती स्रेहा गौतम, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, जि.प. सभापती विमल अर्जुन नागपुरे, रमेश अंबुले, जि.प. सदस्य शेखर पटेल, विठोबा लिल्हारे, सीमा मडावी, विजय लोणारे, गेंदलाल शरणागत, प्रकाश रहमतकर, चमनलाल बिसेन, रमेश लिल्हारे, सरपंच बहेकार आदींनी आ.अग्रवाल यांचे आभार मानले. ( प्रतिनिधी)