भक्तीमुळे वाढतो पुण्यसंचय

By admin | Published: February 7, 2017 01:00 AM2017-02-07T01:00:03+5:302017-02-07T01:00:03+5:30

भक्ती केल्याने मनाचे सामर्थ्य वाढते. मन व्यापक होते. भक्ती मनाचा आयाम आहे. भक्तीमुळे पुण्यसंचय वाढते. सामर्थ्य वाढले तर आयुष्यातले प्रश्न सुटतात.

Devotion increases due to devotion | भक्तीमुळे वाढतो पुण्यसंचय

भक्तीमुळे वाढतो पुण्यसंचय

Next

कानिफनाथ महाराज : प्रवचन, दर्शन व साधक दीक्षा कार्यक्रम
अर्जुनी मोरगाव : भक्ती केल्याने मनाचे सामर्थ्य वाढते. मन व्यापक होते. भक्ती मनाचा आयाम आहे. भक्तीमुळे पुण्यसंचय वाढते. सामर्थ्य वाढले तर आयुष्यातले प्रश्न सुटतात. हरिनामामध्ये प्राबल्य आहे. प्राबल्यामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकतो. यासाठी भक्ती करा व जीवन सुखमय बनवा, असे प्रतिपादन जगतगुरु नरेंद्र महाराज यांचे वारसदार कानिफनाथ महाराज यांनी केले.
ते येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित प्रवचन, दर्शन व साधक दीक्षा कार्यक्रमात बोलत होते.
ते पुढे म्हणाले, जो रंजल्यागांजल्यांची सेवा करतो, जिथे तुझा आणि माझा असा भेदभाव नसतो तिथेच ईश्वर आपले अस्तित्व निर्माण करतो. प्रत्येकाच्या जीवनात दु:ख येतात. मात्र या दु:खाला माणूसच कारणीभूत असतो. माणसाचे विचार, आचरण पवित्र असले पाहिजे. ईश्वर सांगतो आतातरी जागे व्हा. मुनष्य झोपी गेलेला असतो तेव्हा कान व डोळे उघडे असतात. परंतु अंतर्मनातला माणूस झोपलेला असतो. माणसाचं काम प्रेम देणं, दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं आहे. माणूस निस्वार्थ भावनेने जगला पाहिजे, पण असे घडत नाही. याचाच अर्थ आपण अद्याप मनातून जागे झालेलो नाही. ज्याने जीवनाच्या केंद्रबिंदूला घट्ट मिठी मारली तो आमिष, वासना व स्वार्थाला बळी पडत नाही. आपण ज्याला माझं म्हणतो ते आपलं नाही. तरी सुद्धा माणूस आमिषाला बळी पडतो व नुकसान होते. माणसाने ज्या गोष्टीला माझं म्हटलं आहे तिथेच प्रश्न निर्माण होतात व दु:ख वाट्याला येते. माया जीवनात आनंद देते. पण तेवढेच दु:खही देते. ज्यावेळी माणसात भ्रम, अहंकार निर्माण होतो, तेव्हा मनुष्य बुडतो. मायेची माणसाला नशा येते. बुद्धीला भ्रम पडतो. यातून बाहेर पडण्यासाठी ईश्वराचं अधिष्ठान आपल्या मनात बिंबवणं गरजेचं आहे. मग ईश्वर कुठे आहे. कलियुगात ईश्वर मंदिरात नाही, तो संतामध्ये आहे. त्याला ओळखण्याची पात्रता माणसामध्ये निर्माण झाली पाहिजे. कलियुगात देवाने संतामध्येच देवत्व निर्माण केले आहे. स्वप्नातही कुणाचं वाईट चिंतू नका. वैऱ्याशीही चांगले वागा. चांगले कर्म व आचरण केल्याने जीवनमान उंचावता येते. भक्तीमुळे पुण्य वाढते. पुण्य वाढले की मागच्या काळातील दुष्कर्म संपुष्टात येतात. मनाचे सामर्थ्य वाढले की उद्भवलेल्या प्रसंगात काय निर्णय घ्यायचा, कर्म कसे करायचे हे आपोआप सुचते. यासाठी दररोज भक्ती केली पाहिजे. सद्गुरु म्हणजे भक्तीची बँक आहे. सद्गुरुवर विश्वास ठेवा, तो तुमच्या पाठीशी उभा राहील. जोवर तुमच्यात अहंकार आहे तोवर देवाचा अनुभव येणार नाही. माणसाच्या मनात प्रचंड ऊर्जा, ताकद आहे. मन रिकामं राहीलं तर सैरावैरा पळतं. यासाठी मनाला काबूत ठेवणं गरजेचं आहे. मनावर संयम नसला तर वाईट घडतं. मन विक्षिप्त झालं, संस्काराला सोडून वागायला लागलं तर जीवनात दु:ख, त्रास होतो. जीवनाची दुर्दशा होते. अपयश व नैराश्य येते. माणसाचं मन माणसाला राजा व भिकारीही बनवू शकतं. यशामुळे माणसाचा अहंकार वाढतो व अहंकारातून माणूस संपतो. त्यासाठी अहंकार बाळगू नका, असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी माजी आ. रामरतन राऊत, नगराध्यक्षा पौर्णिमा शहारे, जि.प.च्या बांधकाम व अर्थ समिती सभापती रचना गहाणे, शिव शर्मा, उमाकांत ढेंगे, विजय कापगते, संज़य ठाकरे, दीपक गुप्ता, हर्षल मोदी, प्रकाश गहाणे, अशोक चांडक, गिरीष पालीवाल उपस्थित होते. संस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत २५ निराधार महिलांना शिलाई यंत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी सुमारे १० हजार दर्शनार्र्थींनी हजेरी लावली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Devotion increases due to devotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.