एक लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:19 AM2017-08-23T00:19:46+5:302017-08-23T00:23:27+5:30
मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील एक लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील एक लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात आली आहे. पावसाअभावी धान वाळत चालल्याने ती वाचविण्यासाठी शेतकºयांची केविलवाणी धडपड सुरू असल्याचे बिकट चित्र जिल्ह्यात आहे.
खरीपात जिल्ह्यात एकूण १ लाख ७८ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. त्यात सर्वाधिक धानाची १ लाख हेक्टरवर लागवड केली जाते. यंदा सुरूवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकºयांनी सुध्दा सावध भूमिका घेत धानाचे पºहे टाकले.
जुलै महिन्यात थोडा समाधानकारक पाऊस झाला. आॅगस्ट महिना संपत येत असताना अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने पºहे करपत असल्याचे चित्र आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांनी कसे बसे पºहे वाचवून रोवणी आटोपली. तर काहींनी जलाशयाचा पाण्याचा आधार घेत रोवणी केली. पण, सुरूवातीपासूनच जलाशयाचे पाणी वापरले तर पुढे काय असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांत प्रथमच अशी दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने बळीराजा चिंतातूर आहे. पाऊस लांबल्याने रोवण्या खोळंबल्या असून त्याचा उत्पादनावर परिणामी होण्याची शक्यता आहे. येत्या चार पाच दिवसांत पाऊस न झाल्यास १ लाख हेक्टरमधील धानपिके धोक्यात येण्याची शक्यता आहे.
धरणामध्ये १० ते १५ टक्के पाणी
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यावर बºयाच प्रमाणात शेती अवलंबून आहे. शिवाय यावरच भूजल पातळी अवलंबून असते. मात्र जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सुध्दा १० ते १५ टक्केच पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे
केवळ ५८ टक्केच पाऊस
१ जून ते २१ आॅगस्टदरम्यान जिल्ह्यात सरासरी १३४९ मि.मी.पाऊस पडतो. मात्र यंदा या कालावधी केवळ ५६० मि.मी.पावसाची नोंद झाली असून केवळ ५८ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पावसाची सरासरी उणे आहे.
दोन जिल्हे कोरडेच
दोन दिवसांपूर्वी विदर्भात गोंदिया व भंडारा जिल्हा वगळता सर्वत्र दमदार पाऊस झाला. मात्र हे दोन्ही जिल्हे अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आॅगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेल्यास जिल्हा पिकांची बिकट परिस्थिती निर्माण होण्याची नाकारता येत नाही.
कृषी विभागाने वर्तविली शक्यता
आॅगस्ट महिना संपत येत असताना जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने केलेली रोवणी संकटात आली आहे. तर पºहे देखील वाळत चालली आहे. दमदार पाऊस न झाल्यास जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. त्यासंबंधीचा अहवाल कृषी आयुक्त आणि शासनाकडे पाठविला आहे.