धानमळणी यंत्राने संगीताला दिली आर्थिक साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 09:46 PM2017-12-06T21:46:28+5:302017-12-06T21:51:15+5:30

घरी पाच ऐकर शेती असल्यामुळे रोवणी, कापणी व मळणी यासाठी मजूर मिळत नव्हते. त्यामुळे शेतीकामात खूप अडचणी येत होत्या.

Dhanmalani Yantra gave music to Sangeeta | धानमळणी यंत्राने संगीताला दिली आर्थिक साथ

धानमळणी यंत्राने संगीताला दिली आर्थिक साथ

Next
ठळक मुद्देअवनी स्वयंसहायता महिला बचत गट : शेतीकामात उद्भवणाऱ्या अडचणींवर केली मातआम्ही स्वयंसिद्धा-४

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : घरी पाच ऐकर शेती असल्यामुळे रोवणी, कापणी व मळणी यासाठी मजूर मिळत नव्हते. त्यामुळे शेतीकामात खूप अडचणी येत होत्या. मात्र महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहकार्य व अवनी बचत गटामुळे सालेकसा तालुक्याच्या पांढरी येथील संगीता हरिकिशन गिरिया यांनी धान मळणी मशीन घेवून शेतीकामात उद्भवणाऱ्या अडचणींवर मात केली. तसेच गावातील इतर शेतकरीसुद्धा सदर मशीनचा उपयोग करीत असल्यामुळे संगीता यांना नवीन व्यवसाय मिळून नफासुद्धा होवू लागला.
पांढरी येथे सर्व समाजाचे लोक राहतात. सर्वांच्या घरी थोड्याफार प्रमाणात शेती आहे. मजुरीचे काम सर्व लोक करीत असल्यामुळे गावात मजूर वेळेवर मिळत नाही. गावात विकास ग्रामसंस्था असून या ग्रामसंस्थेला एकूण २२ गट जुडलेले आहे. यापैकी अवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिव असलेल्या संगीता यांच्याकडे पाच एकर शेती आहे. वेळेवर मजूर मिळत नसल्याने त्यांना रोवणी, कापणी व मळणी यासाठी मोठीच समस्या निर्माण होत होती.
अवनी गटाला सप्टेंबर महिन्याला १५ हजारांचा फिरता निधी जमा झाल्यानंतर गटाने सीआयएफ (सामुदायिक गुंतवणूक निधी) ६० हजार रूपयांची मागणी केली. संगीता यांनी सीआयएफ कर्ज घेवून धानमळणी मशीन घेण्याचे ठरविले. त्याबाबत ग्रामसंस्थेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. गटाच्या अध्यक्ष कुंती वाल्मिक माहुले यांनी अवनी गटाला ६० हजार रूपये देण्यासाठी सर्वानुमते सभेत मंजुरी दिली. अवनी बचत गटाने सीआयएफ ६० हजार व फिरता निधी १५ हजार असे एकूण ७५ हजार रूपये गटामध्ये जमा झाले. सदर गट नवीनच असल्यामुळे बचत थोडी कमी होती.
त्यामुळे सीआयएफमधून कर्ज घेवून धानमळणी मशीन खरेदी करण्याचा विचार केला. तसेच ३० सप्टेंबरला त्यांनी धानमळणी मशीन खरेदी केली. यात सीआयएचचे ६० हजार रूपये व स्वत: घरून काही पैसे लावले. त्यानंतर गावात धानमळणी करण्यास त्यांनी सुरूवात केली.
गावात एक नवीन मशीन आल्यामुळे सर्वांना आनंद झाला. मशीनद्वारे धान मळणी करण्यासाठी सर्व तयार झाले. संगीता यांनी सर्वप्रथम स्वत:च्या शेतात धानमळणीने सुरूवात केली. नंतर त्यांचे काम बघून गावातील सर्वांनीच मशीनने धान मळणीची ईच्छा व्यक्त केली.
सर्व शेतकरी महिलांनी धान मळणीसाठी मशीनने सुरूवात केल्यामुळे संगीता यांना नवीन व्यवसाय मिळाला व त्यात त्यांना नफा होवू लागला. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली.
१५ सदस्यांचे अवनी बचत गट
सालेकसा येथून सात किमी अंतरावर पांढरी गाव आहे. त्यात एकूण २१२ कुटुंब संख्या आहे. ग्रामसंस्थेत एकूण २२ गट असून अवनी स्वयंसहायता महिला बचत गट एक आहे. या गटाची स्थापना १६ मार्च २०१७ असून एकूण सदस्य संख्या १५ आहे. संगीता गिरीया हे अवनी गटाचे सदस्य असून त्यांना शेतीकामात येणाºया अडचणीमुळे व गावात धान मळणी यंत्र नसल्यामुळे सदर यंत्र घेण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.

Web Title: Dhanmalani Yantra gave music to Sangeeta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.