धापेवाडा उपसा सिंचन टप्पा- २चे पाणी मार्च २०२२ पर्यंत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:32 AM2021-05-25T04:32:59+5:302021-05-25T04:32:59+5:30

तिरोडा : आमदार विजय रहांगडाले यांनी धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्रमांक २चे पाणी चोरखमारा, बोदलकसा, रिसाळा, भदभद्या व संग्रामपूर ...

Dhapewada Upsa Irrigation Phase-2 water will be available till March 2022 | धापेवाडा उपसा सिंचन टप्पा- २चे पाणी मार्च २०२२ पर्यंत मिळणार

धापेवाडा उपसा सिंचन टप्पा- २चे पाणी मार्च २०२२ पर्यंत मिळणार

Next

तिरोडा : आमदार विजय रहांगडाले यांनी धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्रमांक २चे पाणी चोरखमारा, बोदलकसा, रिसाळा, भदभद्या व संग्रामपूर या जलाशयात पाईपलाईनद्वारे सोडण्याच्या कामाकरिता २९० कोटी रुपये शासनाकडून मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू करवून घेतले. आजघडीला ९० टक्के काम पूर्ण झाले असून, मार्च २०२२पर्यंत लाभ क्षेत्राअंतर्गत शेतकऱ्यांना पाणी देण्याकरिता कामाच्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला.

त्यामध्ये प्रामुख्याने एकत्रित कामांपैकी बोदलकसा व सर्रा पाईपलाईन ० ते ८५१० मीटरपैकी रेल्वे ओलांडणीच्या जागी १०० मीटर, लोधीटोला गावाजवळ ४२० मीटर तसेच बोदलकसा पाईपलाईनच्या सुकडी गावाजवळ १२०० मीटर काम बाकी आहे. तसेच टप्पा- २ कार्यान्वित करण्याकरिता आणखी ८५ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अंकुर कापसे यांनी दिली. हे काम जून २०२१ पर्यंत मान्सूनपूर्व करण्याचे निर्देश आमदार रहांगडाले यांनी दिले आहेत. तसेच पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर गोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करण्याकरिता गुमडोह तलावात पाईपलाईनद्वारे पाणी सोडण्याकरिता कामाला लागण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

तसेच शेतकऱ्यांना सिंचनविषयक सोयी सुविधा उपलब्ध करण्याकरिता सदैव कटिबद्ध असून, निमगाव प्रकल्पाचे कामसुद्धा दिवाळीनंतर सुरू होणार असल्याची माहिती आमदार रहांगडाले यांनी दिली. आढावा बैठकीत प्रामुख्याने अधीक्षक अभियंता जे. डी. टाले, कार्यकारी अभियंता अंकुर कापसे, उपअभियंता पंकज गेडाम, के. एस. मुनगीनवार, कनिष्ठ अभियंता आर. आर. देशमुख उपस्थित होते.

Web Title: Dhapewada Upsa Irrigation Phase-2 water will be available till March 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.