भटक्या विमुक्त समाजाचे ‘दे धक्का’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 10:20 PM2018-06-12T22:20:56+5:302018-06-12T22:21:03+5:30
भटक्या विमुक्त जमाती, मच्छीमार संघटना, विशेष मागासप्रवर्ग यांच्या विविध मागण्यांकरीता संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदेच्या वतीने मंगळवारी (दि.१२) येथे दे धक्का आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : भटक्या विमुक्त जमाती, मच्छीमार संघटना, विशेष मागासप्रवर्ग यांच्या विविध मागण्यांकरीता संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदेच्या वतीने मंगळवारी (दि.१२) येथे दे धक्का आंदोलन करण्यात आले.या दरम्यान दोनशे ते अडीचशे लोकांनी तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून नायब तहसीलदार रमेश कुंभरे यांना निवेदन दिले.
विमुक्त भटक्या जमाती व विशेष प्रवर्गाला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, न.प., मनपामध्ये १३ टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, राज्याच्या अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात यावी, तलाव, जलाशय कंत्राटी पद्धत पूर्वीप्रमाणे राबविण्यात यावी, निलक्रांती योजनेंतर्गत गरीबांसाठी आलेली सबसीडीची रक्कम जाळे, होळ्या, मत्यस्यबीज व संवर्धन तळी यावर खर्च करण्यात यावी, भूमिहिनांना जमीन, बेरोजगारांना प्रशिक्षण व कर्ज, घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. आदी मागण्यांचा समावेश असलेले निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री आणि दुग्ध व मत्स्य व्यवसाय मंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांना देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व दीनानाथ वाघमारे, महेश अहिरकर, शिवानंद तुमसरे, रविंद्र देवगडे, प्रकाश भलावी, वंदना बोंदरे, श्यामकला शेंडे, हेमराज मेश्राम, विजय उकेबोंद्रे, भाऊलाल तुमसरे, संपत हंगार, मधुकर देवगडे, ईश्वर बावणे, जगदीश सोनेवाने यांनी केले.