ढिवर समाज व मत्स्य तलाव बचाव समितीचे धरणे

By admin | Published: May 17, 2017 12:17 AM2017-05-17T00:17:49+5:302017-05-17T00:17:49+5:30

शासनाच्या धोरणांमुळे मत्स्य व्यवसाय अडचणीत येऊ लागला आहे. या धोरणामध्ये बदल करण्यात यावे,

Dhindar Society and Fisheries Lake Rescue Committee | ढिवर समाज व मत्स्य तलाव बचाव समितीचे धरणे

ढिवर समाज व मत्स्य तलाव बचाव समितीचे धरणे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाच्या धोरणांमुळे मत्स्य व्यवसाय अडचणीत येऊ लागला आहे. या धोरणामध्ये बदल करण्यात यावे, तसेच मत्स्य व्यवसायाला सहकार्य करण्यात यावे या मागणीला घेऊन सोमवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढिवर समाज व मत्स्य तलाव बचाव समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांना देण्यात आले.
जिल्ह्यातील मासेमारी करणाऱ्या तलावांच्या लिलावावर आणलेली स्थगिती मागे घेण्यात यावी, तलावातील गाळ उपसा करून मासेमारीसाठी उपलब्ध करुन देण्यात यावे, तलावांवर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे, तलावांची पुर्नमोजणी करण्यात यावी, तलावांच्या निकासी गेटची दुरुस्ती करण्यात यावी, त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसायाला आवश्यक साहित्य पुरवठा योजनांतर्गत करण्यात यावा आदी मागण्यांना घेवून मत्स्य तलाव बचाव संघर्ष समिती व ढिवर समाज संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व संजय केवट, परेश दुरुगवार, जयचंद नगरे, महेद्र वालदे, जयेंद्र बागडे, कोमेश कांबळे, उमराव मांढरे, चंद्रकला कुतराहे, यशवंत दिघोरे, देवीलाल धुमके यांनी केले. दरम्यान शासनाच्या दुटप्पी धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला.
आंदोलन मंडपाला राज्याचे सामाजीक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी भेट देवून आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या व त्यांचे निवेदनही स्वीकारले. यानंतर आंदोलनकर्त्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Web Title: Dhindar Society and Fisheries Lake Rescue Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.