दिव्यांग बालकांचे रोग निदान व उपचार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:20 AM2021-06-18T04:20:51+5:302021-06-18T04:20:51+5:30
गोंदिया : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानअंतर्गत दिव्यांग बालकांचे मोफत रोग ...
गोंदिया : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानअंतर्गत दिव्यांग बालकांचे मोफत रोग निदान आणि उपचार शिबिर घेण्यात आले.
या कॅम्पचे आयोजन नगरसेवक लोकेश यादव यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे यांच्या मार्गदर्शनात केले होते. यावेळी प्रमुख चिकित्सक नेत्र शल्यचिकित्सक डॉ. विजय कटरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, नेत्र समुपदेशक भविका बघेले, पारस लोणारे, अजित सिंग प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी यादव यांनी ० ते १५ वर्षे वयोगटातील जन्मत: असणाऱ्या विशेष दिव्यांग बालकांचे मोफत उपचार केंद्र केटीएसतर्फे सुरू आहे, त्याचा लाभ घेतला पाहिजे, असे सांगितले. डॉ. हुबेकर यांनी पालकांनी बर्थ डिफेक्ट लपवू नये, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते वेळीच दुरुस्त करता येतात सरकारच्या मोफत उपचार सुविधेचा लाभ घेतला पाहिजे, असे सांगितले. डॉ. कटरे यांनी नवजात शिशूंच्या डोळ्यांची काळजी कशी घेतली पाहिजे याची सविस्तर माहिती दिली. तसेच मुक्यरमायकोसिस होऊ नये म्हणून प्रत्येकाने काय काळजी घेतली पाहिजे ते सविस्तरपणे सांगितले. या शिबिरात ४० बालकांची मोफत तपासणी आणि उपचार प्रशिक्षित डॉक्टरांमार्फत करण्यात आले.