डिझेल-पेट्रोलची दरवाढ ही केंद्र सरकारच्या नाकर्तेपणाचे फलित ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:36 AM2021-06-09T04:36:35+5:302021-06-09T04:36:35+5:30

गोंदिया : मोदी सरकारच्या कार्यकाळात डिझेल-पेट्रोल व गॅसचे दर गगनाला भिडलेले आहेत. पेट्रोल १०० रुपये, तर डिझेल ९३ रुपयांच्यावर ...

Diesel-petrol price hike is a result of central government's refusal () | डिझेल-पेट्रोलची दरवाढ ही केंद्र सरकारच्या नाकर्तेपणाचे फलित ()

डिझेल-पेट्रोलची दरवाढ ही केंद्र सरकारच्या नाकर्तेपणाचे फलित ()

Next

गोंदिया : मोदी सरकारच्या कार्यकाळात डिझेल-पेट्रोल व गॅसचे दर गगनाला भिडलेले आहेत. पेट्रोल १०० रुपये, तर डिझेल ९३ रुपयांच्यावर गेले आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दरसुध्दा ९०० रुपये प्रतिसिलिंडर आकारले जात आहेत. गॅसवरील सबसिडीसुध्दा नसल्यात जमा आहे. महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोना महामारीच्या संकटाने जनता त्रस्त आहे. त्यात महागाईची झळ सहन करावी लागत आहे. डिझेल-पेट्रोलची दरवाढ ही केंद्र सरकारच्या नाकर्तेपणाचे फलित असल्याचा आरोप कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. एन. डी. किरसान यांनी केला.

डिझेल-पेट्रोल व गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि.७) राज्यात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. किरसान यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील १५ पेट्रोलपंपांसमोर दरवाढीविरोधात निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मोदी सरकाने पेट्रोल, डिझेलमधून कराच्या रूपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे. सन २०१४ पर्यंत केंद्रात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार असताना पेट्रोल ७१.५० रु, तर डिझेल ५५.५० दराने मिळत होते. परंतु मोदी सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर २०१४ चे तुलनेत अर्ध्यावर आले असतानासुध्दा मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करून सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लाेटण्याचे काम केल्याचा आरोप किरसान यांनी केला आहे.

आंदोलनात प्रदेश सचिव विनोद जैन, अमर वराडे, अशोक गुप्ता, जहीर अहमद, सूर्यप्रकाश भगत, योगेश अग्रवाल, आलोक मोहती, नीलम हलमारे, परवेज बेग, राजकुमार पटले, राजेंद्र दुबे, बाबा बागडे, गंगाराम बावनकर, नफिज सिध्दीकी, सोहेम मन्सुरी जीवनलाल शरणागत, नरेश लिल्हारे, दीपक उके, दिलीप गौतम, संजय शिवणकर, शैलेश देवधारी, बाबुलाल देवधारी, पवन नागदेवे, जियालाल देवधारी, सुबेलाल पाचे सहभागी झाले होते.

Web Title: Diesel-petrol price hike is a result of central government's refusal ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.