स्टॅम्पपेपर अभावी पीक कर्ज उचलण्यास अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 05:00 AM2020-05-12T05:00:00+5:302020-05-12T05:00:07+5:30
‘लॉकडाऊन’चा फटका स्टॅम्प पेपर विक्रेत्यांना सुद्धा बसत आहे. तहसील कार्यालायतून शासन मान्यता प्राप्त स्टॅम्प पेपर विक्रेत्यांना लेखी आदेश नसल्याने त्यांनी गुन्हे दाखल होत असल्याचे सांगत स्टॅम्प पेपर विक्र ी न करण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम महिनाभरावर येऊन ठेपला आहे. यासाठी शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीची कामे करण्यासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे शेतकरी बँकेतून पीक कर्जाची उचल करु न खरीप हंगाम करण्याची तयारी करीत आहे.
राजीव फुंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : सध्या सर्वत्र ‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदी लागू असल्याने स्टॅम्प पेपरची विक्री सुद्धा बंद आहे. स्थानिक तहसील कार्यालयात तहसीलदारांनी स्टॅम्प पेपर विक्रीचे तोंडी आदेश दिले आहे. मात्र त्याचे लेखी आदेश न मिळाल्याने स्टॅम्प पेपर विक्रेत्यांनी अद्यापही स्टॅम्प पेपरची विक्री सुरू केली नाही. परिणामी शेतकऱ्यांना पीक कर्जाची उचल करण्यात अडचण जात आहे.
सध्या सर्वच बँकांनी खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटप करण्यास सुरूवात केली आहे. पीक कर्जाची उचल करताना शेतकऱ्यांना स्टॅम्प पेपरवर हमीपत्र द्यावे लागते. यासाठी शेतकरी स्टॅम्प पेपर खरेदी करण्यासाठी तहसील कार्यालयात जात आहे. मात्र ‘लॉकडाऊन’चा फटका स्टॅम्प पेपर विक्रेत्यांना सुद्धा बसत आहे. तहसील कार्यालायतून शासन मान्यता प्राप्त स्टॅम्प पेपर विक्रेत्यांना लेखी आदेश नसल्याने त्यांनी गुन्हे दाखल होत असल्याचे सांगत स्टॅम्प पेपर विक्र ी न करण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम महिनाभरावर येऊन ठेपला आहे. यासाठी शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीची कामे करण्यासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे शेतकरी बँकेतून पीक कर्जाची उचल करु न खरीप हंगाम करण्याची तयारी करीत आहे.
शासनाने संचारबंदी आणि ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत कृषी विषयक कामांना सुट दिली आहे. तसेच ‘लॉकडाऊन’चा शेतकºयांना फटका बसणार नाही याची काळजी शासनाकडून घेतली जात आहे. मात्र शेतकºयांना स्टॅम्प पेपर, सातबारा इतर कागदपत्रांसाठी तहसील कार्यालय आणि तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहे. येथील शासकीय कामे बंद असल्याने स्टॅम्प व्हेंडर सुद्धा स्टॅम्प पेपर विक्र ीसाठी तहसीलदारांचे लेखी आदेश नसल्याचे सांगत स्टॅम्प पेपरची विक्र ी करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शेतकºयांना पीक कर्जाची उचल करण्यात अडचण जात आहे. तरी जिल्हाधिकाºयांनी याची दखल घेऊन स्टॅम्प पेपर मिळण्याची शेतकºयांची अडचण दूर करावी अशी मागणी केली जात आहे.
शेतकºयांना पीक कर्जापासून वंचित ठेवता येत नाही. स्टॅम्प पेपर विक्र ेत्यांना स्टॅम्प पेपर विक्र ी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करु न स्टॅम्प पेपरची विक्र ी करावी. शेतकºयांना शासकीय दरात स्टॅम्प पेपर उपलब्ध करु न द्यावे.
- दयाराम भोयर, तहसीलदार आमगाव.
तहसील कार्यालयातून स्टॅम्प पेपर विक्र ीचे कुठलेही लेखी आदेश मिळाले नाही. राज्यात बहुतेक ठिकाणी स्टॅम्प पेपर विक्री करताना व्हेंडरवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळेच जोपर्यंत तहसील कार्यालयाकडून लेखी आदेश मिळत नाही तोपर्यंत यातील तिढा सुटणार नाही.
- स्टॅम्प पेपर विक्र ेता संघ, आमगाव.