दिलासा, रब्बी धान खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:20 AM2021-07-02T04:20:28+5:302021-07-02T04:20:28+5:30

गोंदिया : रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदीची मुदत ३० रोजी संपली. मात्र अद्याप पूर्व विदर्भात ८० लाख क्विंटलहून धान ...

Dilasa, extension till July 31 for purchase of rabi paddy | दिलासा, रब्बी धान खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

दिलासा, रब्बी धान खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

Next

गोंदिया : रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदीची मुदत ३० रोजी संपली. मात्र अद्याप पूर्व विदर्भात ८० लाख क्विंटलहून धान शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी मुदतवाढ मिळण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चर्चा केली होती. केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर केंद्रीय अन्न व पुरवठा विभागाने रब्बीतील धान खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचे आदेश गुरुवारी (दि.१) काढले आहे.

पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या पाच जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बीतसुध्दा शासकीय धान खरेदी केली जाते. हमीभावापेक्षा शेतकऱ्यांना कमी दर मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महांमडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते. पण यंदा मागील खरीप हंगामातील धानाची भरडाईसाठी उचल झाली नव्हती. त्यामुळे १ कोटी क्विंटलहून अधिक धान गोदामात तर ४० लाख क्विंटलवर धान उघड्यावर पडला होता. त्यामुळे रब्बीतील धान खरेदीवर परिणाम झाला होता. गोदाम रिकामे नसल्याने धान खरेदीची प्रक्रिया संथगतीने सुरू होती. तर आतापर्यंत केवळ ५ लाख क्विंटलच धान खरेदी झाली होती. तर यंदा रब्बीत मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन झाल्याने मोठ्या प्रमाणावर धान शेतकऱ्यांकडे शिल्लक होता. रब्बीतील धान खरेदीची मुदत ३० जूनपर्यंतच होती. ही मुदत संपल्याने हजारो शेतकऱ्यांसमोर धान विक्रीचा प्रश्न निर्माण झाला होता. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. याचीच दखल घेत खा. प्रफुल्ल यांनी रब्बीतील धान खरेदीला मुदतवाढ देण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता. याचीच दखल केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा सचिवांनी धान खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे पत्र गुरुवारी काढले. यामुळे पूर्व विदर्भातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रब्बी धान खरेदीला १ महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी यासाठी माजी आ. राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, राजूृ कारेमोरे यांचा सुध्दा खा. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता.

................

संपूर्ण धानाची होणार खरेदी

दरवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीतील धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात ३० लाख क्विंटल धानाची खरेदी होण्याचे उद्दिष्ट या दोन्ही विभागाने ठेवले होते. पण गोदामाअभावी केवळ ५ लाख क्विंटलच धान खरेदी झाली होती. तर लाखो क्विंटल धान शेतकऱ्यांकडे शिल्लक होता. मात्र आता ३१ जुलैपर्यंत धान खरेदीला मुदतवाढ मिळाल्याने संपूर्ण धानाची खरेदी होणार आहे.

Web Title: Dilasa, extension till July 31 for purchase of rabi paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.