दिनकरनगरच्या सरपंचांचा भाजपला रामराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:20 AM2021-06-24T04:20:27+5:302021-06-24T04:20:27+5:30
अर्जुनी मोरगाव : तालुक्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींमध्ये वेगवान घडामोडी सुरू आहेत. दिनकरनगर येथील सरपंचा सुचित्रा विनय शील ...
अर्जुनी मोरगाव : तालुक्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींमध्ये वेगवान घडामोडी सुरू आहेत. दिनकरनगर येथील सरपंचा सुचित्रा विनय शील यांनी भाजपला रामराम ठोकत स्वगृही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
केशोरी येथे सोमवारी योग दिनाचे औचित्य साधून तालुका युवक काँग्रेस कमिटीच्यावतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत घाटबांधे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस कमिटी तालुका उपाध्यक्ष घनशाम लांबट, दिनकरनगरचे उपसरपंच सुबोध मुजुमदार, बाबूराव गहाणे, अरुण मस्के, राधेश्याम धांडे, सुनील लंजे, योगेश नाकाडे, विनोद गहाणे उपस्थित होते. काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सरपंच सुचित्रा विनय शील यांनी घरवापसी केल्याचे जाहीर केले. आगामी काळात अनेक पक्षांतून काँग्रेसमध्ये गृहपरतीची लाट येईल असा आशावाद जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्रीकांत घाटबांधे यांनी यावेळी व्यक्त केला. सरपंच सुचित्रा विनय शील यांचे घाटबांधे यांनी काँग्रेस पक्षाच्यावतीने स्वागत केले. यावेळी भानुमती सरकार, अशीत मंडल, सतीश रॉय, अनंत रॉय, राजीव सरकार, निसिध मंडल, विनय शील, देवरत शील, मृण्मयी मंडल, कृष्णा मंडल, प्रशांत सरदार उपस्थित होते.
===Photopath===
220621\18061846-img-20210622-wa0014.jpg
===Caption===
दिनकरनगरच्या सरपंच शील यांचा काँग्रेसमध्ये स्वागत करतांना घाटबांधे