जागेअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय
By admin | Published: July 24, 2014 11:56 PM2014-07-24T23:56:12+5:302014-07-24T23:56:12+5:30
येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत आता मुलांना बसण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांना त्रास सहन करावे लागत आहे. खातिया येथे दोन दिवस वादळी पाऊस आल्याने जिल्हा परिषद माध्यमिक
खातिया : येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत आता मुलांना बसण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांना त्रास सहन करावे लागत आहे. खातिया येथे दोन दिवस वादळी पाऊस आल्याने जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील झाडे शालेय इमारतीवर पडून त्या इमारती क्षतीग्रस्त झाल्या आहेत.
आता विद्यार्थ्यांना बसण्यास जागेची समस्या निर्माण होईल. पहिली ते सातवीपर्यंच्या विद्यार्थ्यांना पूर्वीपासूनच जागेची कमी आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे कवेलांची दुरवस्था झाली आहे. कवेलूही तुटलीफुटली आहेत. पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मोठाच त्रास होतो. आता मोठमोठी झाडे शाळेच्या इमारतीवर पडल्याने विद्यार्थ्यांनी बसायचे कुठे? हा प्रश्न विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पडला आहे.
यासंबंधी मुख्याध्यापकांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीने काय ते ठरावायचे. ग्रा.पं. प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.
पण याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. रावनवाडी केंद्रांतर्गत ही खातिया येथील प्रथम अशी शाळा आहे जिथे की कवेलुच्या इमारतीमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी पावसाच्या दिवसामध्येही येथे माकडांचा उधम चालत असतो. त्यामुळे या दिवसात विदयर्थ्यांना प्रत्येक वर्षी पावसाचा त्रास सहन करावा लागतो.
खातिया येथील सरपंच केशोराव तावाडे व उपसरपंच सुरजलाल खोटेले यांनी शासनास मागणी केली आहे की, जिल्हा परिषद शाळेमध्ये मजबूत इमारती बनविण्यात यावे. या शाळेच्या वतीने व ग्रामपंचायतच्या वतीने अनेकदा ठराव पाठविण्यात आले आहेत. पण संबंधित विभाग लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)