जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाचा ठपका

By admin | Published: January 19, 2017 01:37 AM2017-01-19T01:37:12+5:302017-01-19T01:37:12+5:30

माहितीच्या अधिकाराखाली जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी तिरोडा तालुक्यात आॅगस्ट २०१४ ते जुलै २०१५ या काळात

Disciplinary reprimand on District Social Welfare Officer | जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाचा ठपका

जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाचा ठपका

Next

राज्य माहिती आयोगाचा दणका : माहितीच्या अधिकारात माहिती न दिल्याचा प्रकार
गोंदिया : माहितीच्या अधिकाराखाली जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी तिरोडा तालुक्यात आॅगस्ट २०१४ ते जुलै २०१५ या काळात केलेला दौरा दैनंदिनी व गावात भेटी दिलेल्या व्हिजीट बुकची साक्षांकीत प्रत देण्याची मागणी करण्यात आली होती.परंतु यावर माहिती न देणाऱ्या जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना राज्य माहिती आयुक्त यांनी शिस्तभंगाचा ठपका ठेवत स्पष्टीकरण मागीतले आहे.
तिरोडा तालुक्यातील किती गावातील बांधकामाची पाहणी करून मुल्यांकन प्रमाणपत्र व पूर्णत्वाचे प्रामणपत्र देण्यात आले. याची साक्षांकरीत सत्यप्रत देण्याचीमागणी करण्यात आली. परंतु जन माहिती अधिकारी यांनी विहीत मुदतीत कोणताही प्रतिसाद दिला नाही. माहिती न मिळाल्याने प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी घ्यायला पाहिजे होती परंतु ते ही घेण्यात आली नाही. माहिती न मिळाल्याने आयोगाकडे द्वितीय अपील सादर केल्याने आयोगाने त्यावर सुनावणी ठेवली. सुनावणीच्या दिवशी अपिलार्थी हजर होते. परंतु जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी गैरहजर होते. कुठलीही सूचना न देता अधिकारी गैरहजर होते.
त्यामुळे अपिलार्थ्याला १५ दिवसाच्या आत सदर माहिती विनामूल्य देण्यात यावी व ३० दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश जनमाहिती अधिकारी तथा जिल्हा समाज कल्याण कार्यालय जि.प.गोंदिया यांना देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

- ग्रामसेवक व बीडीओलाही दणका
गट ग्रामपंचायत सोनोली/ बिरोली येथील सन १९९० ते १९९४ या काळात जन्म व मृत्युच्या नोंदीची माहिती महेंंद्र नंदागवळी यांनी मागीतली होती. परंतु माहितीच्या अधिकारात त्यांना माहिती देण्यात आली नाही. त्याबद्दल ग्रामसेवक व खंडविकास अधिकारी याच्यावर ठपका ठेवत सात दिवसाच्या आत माहिती देण्याचे आदेश देण्यात आले.

 

Web Title: Disciplinary reprimand on District Social Welfare Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.