सलंगटोलावासीय ‘डिसकनेक्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 10:10 PM2018-07-02T22:10:08+5:302018-07-02T22:11:22+5:30
शासन व प्रशासनातर्फे पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत ग्रामीण आणि दुर्गम भागात रस्त्यांचे जाळे तयार करुन त्यांना तालुका आणि शहराशी कनेक्ट केले जात असल्याचा दावा केला जात आहे. पण, सडक अर्जुनी तालुक्यातील सलंगटोला येथे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने या गावातील लोक तालुका व विकासापासून डिसकनेक्ट असल्याचे चित्र आहे.
वामन लांजेवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा (कोयलारी) : शासन व प्रशासनातर्फे पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत ग्रामीण आणि दुर्गम भागात रस्त्यांचे जाळे तयार करुन त्यांना तालुका आणि शहराशी कनेक्ट केले जात असल्याचा दावा केला जात आहे. पण, सडक अर्जुनी तालुक्यातील सलंगटोला येथे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने या गावातील लोक तालुका व विकासापासून डिसकनेक्ट असल्याचे चित्र आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील दल्ली (रेंगेपार) ग्रामपंचायत अंतर्गत या गावाचा समावेश आहे. या गावात केवळ आदिवासी समाजाची लोकवस्ती आहे. हे गाव आदिवासी बहुल, नक्षल व अतिदुर्गम भागात येते. त्याची पारंपरिक भाषा गोंडी असून शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. गावात जाण्यासाठी पक्के सोडा कच्चे रस्ते नसल्याने गावकऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे विकासपासून वंचित राहावे लागत आहे.
रस्त्याची सोय नसल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना शेतामधून ये-जा करावी लागते.गावात शाळा, अंगणवाडी, मोबाईल सेवा, आरोग्य सेवा अशा कुठल्याच सोयी सुविधा सोई नाहीत. ग्रामपंचायतचे सुद्धा या गावाकडे लक्ष नसल्याने गावात समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. येथील गावकरी मुलभूत सोयी सुविधां मुकल्याचे चित्र आहे. गावात जाण्यासाठी रस्ता तयार करून देण्याची मागणी येथील गावकºयांनी अनेकदा केली. मात्र प्रशासनाने अद्यापही याची दखल घेतली नाही. त्यामुळे गावकºयांना अजूनही धुºया पाºयाने व शेतामधून ये-जा करावी लागते.
पालकमंत्र्यांना वेळ मिळे ना
जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले हे सडक अर्जुनी येथीलच रहिवासी आहेत. सलंगटोला हे गाव त्यांच्याच तालुक्यातील असून त्यांच्या निवासस्थानापासून या गावाचे अंतर केवळ ९ कि.मी.चे आहे. मात्र त्यांचे सुध्दा येथील गावकºयांच्या समस्येकडे अद्याप लक्ष गेले नाही. त्यामुळे सलंगटोलावासीयांची समस्या ऐकूण ती मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याचे बोलल्या जाते.
लाखोंचा निधी केवळ नावापुरताच
राज्य सरकार दरवर्षी अंदाजपत्रकात आदिवासींच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करते. त्याचा गाजावाजा सुध्दा शासन आणि प्रशासनाकडून नेहमीच केला जातो. मात्र यानंतरही सलंगटोलासारखे गाव विकासापासून वंचित आहे. गावात जाण्यासाठी अद्यापही रस्ता नसल्याने त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आदिवासी विकासासाठी येणारा कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका जातो कुठे असा
रुग्णांची गैरसोय
सलंगटोला गावातील एखादा व्यक्ती गंभीर आजारी असल्यास त्याला खाटेवरच उचलून नेण्याशिवाय पर्याय नाही. गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने वाहन जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. यामुळे बरचेदा रुग्ण दगावल्याच्या घटना सुध्दा घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने यासर्व गोष्टींची गांर्भीयाने दखल घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
२२ मे ला रात्री १२ वाजता आशा वर्कर आशा धुर्वे यांना प्रसुतीच्या वेदना झाल्या. १०८ क्रमांकावर फोन करण्यात आला. मात्र रस्त्याअभावी गाडी आली नाही. शेवटी खासगी वाहन बोलावून त्यांना गावापासून एक कि.मी. अंतरावर खाटेवर न्यावे लागले.
- राजेश धुर्वे, (आशाचे पती)
...................................
गावकऱ्यांची मागणी रास्त आहे. ग्रामपंचायतने रस्ता तयार करण्याचा ठराव घेवून त्याचे काम सुध्दा कंत्राटदाराला दिले आहे. मात्र पावसाळ्याला सुरूवात झाल्याने रस्ताचे काम सुरू झाले नाही.
-अशोक ठलाल, सरपंच, ग्रा.पं. दल्ली