वर्तमान राजकीय परिस्थितीवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 09:09 PM2018-08-23T21:09:34+5:302018-08-23T21:10:13+5:30
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे माजी वित्तमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीत आमदार अग्रवाल व पाटील यांच्यात राज्यातील वर्तमान राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे माजी वित्तमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीत आमदार अग्रवाल व पाटील यांच्यात राज्यातील वर्तमान राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली.
जयंत पाटील रविवारी (दि.१९) गोंदिया जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. या दौºयात त्यांनी आमदार अग्रवाल यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीत अग्रवाल व पाटील यांच्यात राष्ट्रवादी व कॉँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक विषय, दोन्ही पक्षातील समन्वय व राज्यातील राजकीय परिस्थितींवर अनौपचारिक चर्चा झाली. याप्रसंगी पाटील यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीतील सकारात्मक परिणामांचे उदाहरण देत राज्यात भाजप फक्त कॉँग्रेस-राष्ट्रवादी व विरोधी पक्षातील मतांचे विभाजन करून निवडणूक जिंकत असल्याचे सांगितले.
त्यांनी सांगली व जळगाव येथे भाजपने फक्त ३५ टक्के मतदान घेऊन निवडणूक सर केली. तर विरोधी पक्षाने ६५ टक्के मतदान घेऊनही मत विभाजीत होत असल्यामुळे भाजप जिंकल्याचे सांगीतले. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीने मोठ्या फरकाने निवडणूक जिंकून ही गोष्ट पुन्हा सिध्द केली. त्यामुळे कॉँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आल्यास राज्यात सत्ता परिवर्तन निश्चित असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी कॉँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, माजी आमदार राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, शहर अध्यक्ष अशोक चौधरी, महासचिव अपूर्व अग्रवाल, तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, माजी सभापती अर्जुन नागपुरे उपस्थित होते.