वीज कामगारांच्या मागण्यांवर चर्चा

By admin | Published: October 25, 2015 01:45 AM2015-10-25T01:45:11+5:302015-10-25T01:45:11+5:30

विदर्भ राष्ट्रीय इलेक्ट्रीकल वर्कर्स युनियनच्या गोंदिया व भंडारा पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण व चर्चासत्र शुक्रवारी पार पडले.

Discuss on the demands of electricity workers | वीज कामगारांच्या मागण्यांवर चर्चा

वीज कामगारांच्या मागण्यांवर चर्चा

Next

प्रशिक्षण व चर्चासत्र : गोंदिया-भंडारातील पदाधिकाऱ्यांचा सहभाग
गोंदिया : विदर्भ राष्ट्रीय इलेक्ट्रीकल वर्कर्स युनियनच्या गोंदिया व भंडारा पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण व चर्चासत्र शुक्रवारी पार पडले. यामध्ये वीज कामगारांच्या विविध मागण्यांवर प्रकाश घालून त्यावर चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन विदर्भ राष्ट्रीय इलेक्ट्रीकल वर्कर्स युनियनचे महासचिव एस.वाय.खेवले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी वीज कामगार फेडरेशनचे केंद्रीय उपाध्यक्ष ल.की.टिचकुले होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सल्लागार गणेश रावते, सचिव क्षिरसागर, केंद्रीय प्रतिनिधी सुभाष सेलुकर, सहसचिव दिगंबर कटरे, भंडारा जिल्हाध्यक्ष श्याम वंजारी, केंद्रीय सदस्य हेमंत मोटघरे, विनोज लांजेवार, महिला प्रतिनिधी रंजना उपवंशी, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पंधरप्पा हंस व गडचिरोली जिल्हाध्यक्ष ए.पी.टेंभूर्णीकर उपस्थित होते.
याप्रसंगी सहसचिव कटरे यांनी, यंत्रचालकांवरील अन्याय दूर करण्यासाठी व्यवस्थापनाने त्वरीत तोडगा काढावा, उपकेंद्र सहायक व विद्युत सहयकांना पूर्ण भत्ते व क्वार्टर उपलब्ध करवून द्यावे, तांत्रीक व अतांत्रीक कर्मचाऱ्यांना अतिरीक्त कामाचा मोबदला द्यावा, वसुलीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण द्यावे, तक्रार निवारण समितीच्या सभा विभागीय/ प्रविभागीय स्तरावर दर तीन महिन्यांनी घेण्याचे निर्देश असून सुद्धा काही ठिकाणी दोन-दोन वर्षे सभा घेण्यात येत नाही. अशा सर्व विभाग/प्रविभागांचा अहवाल मागवून संबंधितांवर कार्यवाही करण्यात यावी यासह अन्य मागण्यांवर प्रकाश घालून त्यावर चर्चा करण्यात आली. तसेच या मागण्या निकाली काढण्याच्या दृष्टीने मुंबई मुख्य कार्यालयात बैठक लावून कामगारांचे ज्वलंत प्रश्न निकाली काढावे अशी मागणी केली. खेवले यांनी, कामगारांनी घेण्याच्या सुरक्षा व उपाययोजना यावर सखोल मार्गदर्शन तसेच चर्चा करीत अपघात विरहीत सेवा देण्याचे आवाहन केले.
टिचकुले यांनी, लेका विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी व उपाययोजनांवर मार्गदर्शनपर प्रशिक्षण दिले. रावते यांनी, सर्व मागण्यांचे समर्थन करीत मागण्यां संबंधात मुख्य कार्यालय स्तरावर व्यवस्थापनाशी चर्चा केली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सहा महत्वाचे प्रस्ताव पारीत करण्यात आले व त्याची प्रत कंपनीचे मुख्य कार्यालय व संघटनेच्या मुख्य कार्यालयाला पाठविण्यात आले.
संचालन विश्वजीत मेंढे यांनी केले. आभार अशोक क्षिरसागर यांनी मानले. कार्यक्रमासाठी निलेश बारेवार, कन्हैया वगारे, नरेंद्र पर्वते, विनोद मते, प्रवीण भागवत, धनलाल तिलगामे, विजय वराडे, चंद्रभान झिंगरे, अशोक कोडवते, सी.एम.बागडे, सुभाष शेंडे, उमेश कुथे, ए.के.देशमुख, घनश्याम शेंडे, वाय.के.चुटे, डी.बी.बुद्धे, व्ही.एम.बेलसरे, एम.आर.ईसाळ, एस.एस.चकाटे, अनिल पारधी, पुंडलीक कापगते, रवी ढमढेरे, जी.एन.चौधरी, जीवन कावळे, सचीन राठोड, ईश्वरदास चव्हाण, ज्योती रेवतकर, एस.जे.मेश्राम, रंजू आतीलकर यांच्यासह विदर्भ राष्ट्रीय इलेक्ट्रीकल युनियनच्या सदस्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Discuss on the demands of electricity workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.