ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:10 AM2018-04-21T01:10:35+5:302018-04-21T01:10:35+5:30
अधिकाऱ्यांचे आश्वासन : महासंघाने केले आदोलन स्थगित
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) तर्फे ग्रामपंचयात कर्मचाºयांच्या विविध मागण्यांना घेऊन पंचायत समित्यावर जिल्हा व्यापी आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते. मात्र अर्जुनी-मोरगावचे खंड विकास अधिकारी नारायण जमईवार यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून लेखी आश्वासन दिले.
अनेक कर्मचाºयांचे थकीत वेतन व भत्ता त्वरीत अदा करा, नियमाप्रमाणे वेतन भत्याच्या एकूण रकमेवर दरमहा ८.३३ टक्के भविष्य निर्वाह निधी जमा करा, सर्व सेवा शर्तीची अंमलबजावणी करा व यासाठी जबाबदार अधिकाºयांवर कार्यवाही करा, कर वसुली करीता केवळ कर्मचाऱ्यांना जबाबदार ठरवून अनुदानात कपात करणे व नियमाप्रमाणे ग्रामसेवक व सरपंचावर कार्यवाही करण्याचे टाळणे बंद करा व इतर माण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र आंदोलना पुर्वी खंड विकास अधिकारी जमईवार यांनी पंचायत समिती सभागृहात महासंघाचे प्रतिनिधी, ग्रामसेवक युनियन, सहायक खंड विकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांची संयुक्त सभा घेऊन वरील प्रश्नांवर त्वरीत कार्यवाही करण्याचे लेखी कार्यवृत्त करुन त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यानंतर पुढील आंदोलनाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला.
या चर्चेत मिलींद गणवीर, रविंद्र निसार, सुनिल गणविर, रामु सोनवाने, विठ्ठल सहारे, लोमेश गहाणे, मोरेश्वर सांगोळे व देवानंद दुरुगकर यांनी भाग घेतला. त्याचप्रकारे सालेकसा पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी खाडे यांनीही बैठक घेऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या चर्चेत महासंघाचे मुन्नालाल ठाकरे, टेकचंद चौधरी, राजेंद्र हटेले, कमलेश टेंभुर्णीकर, मनोहर मेश्राम, उमेद चौरे, सूरजलाल मोहारे यांनी भाग घेतला. समाधानकारक चर्चा झाल्याने पुढील आंदोलन स्थगित करण्यात आले.