पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 08:46 PM2017-09-23T20:46:24+5:302017-09-23T20:46:59+5:30

Discuss on the educational progress of children | पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर चर्चा

पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर चर्चा

Next
ठळक मुद्देधोटे बंधू विज्ञान महाविद्यालय : पालक-शिक्षक सभेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात पालक-शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रामुख्याने पालक व शिक्षकांमध्ये योग्य समन्वय स्थापीत करुन कसा प्रकारे पालकांना त्याच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगती विषयी जागरुक करता येईल या उद्देशाने ही सभा आयोजित करण्यात आली.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.आर.चोपणे होते. सभेला पालक शिक्षक सभेचे उपाध्यक्ष किसनलाल पंधरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.एन.ए.एस.स्वामी, प्रा.एस.बी.गुप्ता व प्रा. नरेश असाटी प्रामुख्याने उपस्थित होते. सभेत कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते.
सभेत शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांची उपस्थिती, पाठ्यक्रम, वार्षिक नियोजन, पर्यावरण, शिक्षण, पालकांकडून येणारे विषय इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम कुसूम भोंडे यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर चर्चा घडवून आणली व महाविद्यालय प्रशासनाद्वारे अनुपस्थित विद्यार्थ्यावर योग्य कारवाई करण्याचे संकेत दिले व इयत्ता ११ वी व १२ वी करीता पर्यावरण हा विषय कसा महत्वाचा आहे व पालकाद्वारे यावर लक्ष देण्याकरीता आपले मत मांडले. प्रिया बंसोड यांनी शैक्षणिक सत्रात जून व जुलै मध्ये ११ वी व १२ वी करीता कशाप्रकारे महाविद्यालयद्वारे पाठ्यक्रमाचे नियोजन केले जाते यावर आपले मत व्यक्त केले. वर्ग १२ वी नंतर मेडीकल व इंजिनिअरींग या क्षेत्रात जाणाºया विद्यार्थ्यांकरीता एमसीक्यू टेस्ट महाविद्यालयाकडून नि:शुल्क घेण्यात येते व ती परीक्षा १२ वीत शिकणाºया सर्व विद्यार्थ्यांनी द्यावी, असे प्रा.एन.ए.काटकर यांनी महाविद्यालय प्रशासनाकडून सांगीतले.
कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.एन.ए.एस.स्वामी यांनी, महाविद्यालयीन सुख-सोयी व चालू शैक्षणिक वर्षात होणाºया घडामोडी विषयक विस्तृत माहिती दिली. तसेच पालकांना त्यांच्या काही अडचणी असल्यास सोडविण्याचे आश्वासन दिले व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. मधुकर कापरबोयना यांनी आभार मानले. यावेळी पालक-शिक्षक सभेचे सचिव प्रा.अनिल बोपचे यांनी सभेचे प्रास्ताविक मांडून संचालन केले.

Web Title: Discuss on the educational progress of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.