बिंदुनामावलीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

By Admin | Published: February 28, 2016 02:04 AM2016-02-28T02:04:13+5:302016-02-28T02:04:13+5:30

शिक्षकांचे विविध समस्येवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्याशी भेट घेतली.

Discussion with education officials for point-of-count | बिंदुनामावलीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

बिंदुनामावलीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

googlenewsNext

गोंदिया : शिक्षकांचे विविध समस्येवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्याशी भेट घेतली.
ज्ञान रचना वाद राज्यभर राबविला जात आहे. गोंदिया सारख्या नक्षलग्रस्त व अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या विकासाशी निगडीत ज्ञान रचनावाद जोमाने चालू असल्याचे राज्य उपाध्यक्ष एल.सी.आंधळे यांनी सांगीतले. भरती प्रक्रियेमध्ये भज क,ड व अ या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांवर पदोन्नतीमध्ये अन्याय होत असल्याचे सांगत बिंदू नामावली तयार करण्यात यावी तसेच जीपीएफ धारक शिक्षकांचे सुरूवातीला अंशदायी पेन्शन योजनेच्या नावाखाली जानेवारी ते नोव्हेंबर २०१० पर्यंत रक्कम कपात झाली. परंतु ती रक्कम शिक्षकांना परत मिळाली नाही. गोरेगाव, देवरी, तिरोडा, गोंदिया, सालेकसा, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव या तालुक्यातील अनामत रक्कम परत मिळावी अशी मागणी करण्यात आली. पदविधर शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ मिळावी यावर चर्चा करण्यात आली. सदर चर्चेत संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश लदरे, सरचिटणीस अशोक चेपटे, सहसचिव प्रकाश घुगे, एन.के.बिसेन, राठौड, बढे, कांगणे, पवार, बघेले, पाटील, सांगळे, तिपोले, जाधव सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Discussion with education officials for point-of-count

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.