शिक्षकांच्या समस्यांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:27 AM2021-03-25T04:27:34+5:302021-03-25T04:27:34+5:30
सडक अर्जुनी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नवनियुक्त तालुका कार्यकारिणीने जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार यांच्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्ष प्रदीप ...
सडक अर्जुनी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नवनियुक्त तालुका कार्यकारिणीने जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार यांच्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्ष प्रदीप बडोले यांच्या नेतृत्वात सडक अर्जुनी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी के. वाय. सर्यांम यांची भेट घेऊन त्यांच्याशी शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा केली.
शिक्षक समिती सडक अर्जुनीच्यावतीने आयुक्त कार्यालय नागपुर येथे जी तक्रार दाखल केली आहे त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जे कार्यवाहीबाबत पत्र आहे त्यावर कार्यवाही करुन, जिल्हा परिषदेला या संदर्भात पुन्हा पत्रव्यवहार करणे व वेळप्रसंगी कायदेशीर न्यायालयीन लढाई पंचायत समिती मार्फत लढावी, अशी मागणी करण्यात आली. यावर तात्काळ जिल्हा परिषद पत्रव्यवहार करण्यात येईल असे सांगितले. चटोपाध्याय व निवडश्रेणी प्रकरणाबाबत ज्यांना १२ व २४ वर्ष झाले असतील व त्यांचे प्रस्ताव अप्राप्त असतील त्यांचे प्रस्ताव मागविण्यात येईल व पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषदेत पाठविण्यात येईल. सेवापुस्तकातील नोंदी तात्काळ पूर्ण करणे, ज्यांना जिल्हा परिषद कार्यालयने परीक्षा परवानगी दिली आहे. त्यांच्या सेवापुस्तकात नोंदी त्वरित घेण्यात याव्या, सत्र २०१८- १९ च्या पावत्या प्राप्त होणार असून केंद्रप्रमुखा मार्फत वाटप होणार व ज्यांचे पावती मिळणार नाही त्यांचे नावासहीत यादी जिल्हा परिषदेला पाठवून पावती मिळण्यासाठी कार्यालय मार्फत पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले. यावेळी किशोर डोंगरवार, प्रदीप बडोले, संदीप तिडके, बाळू वालोदे, नरेश मेश्राम, जी.आर. गायकवाड, महेश कवरे, पी.एन.बडोले, जी.जे.कापगते, आनंद मेश्राम, राजेश शेंडे, मंगेश पर्वते, संदीप खेडीकर, एच.एन. परशुरामकर, डी.पी.शहारे, अरुण वैद्य, महेश भिवगडे, जीवन म्हशाखेत्री उपस्थित होते.
.......
सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रस्ताव तयार करणार
सेवानिवृत शिक्षकांचे प्रलंबित देयक तयार करुन निधी मागणी करणे सोबतच जे शिक्षक यानंतर सेवानिवृत होणार आहेत त्यांचे प्रस्ताव सादरीकरणासाठी ५ महिन्यापूर्वीपासूनच कार्यालयामार्फत रीतसर कार्यवाही करुन लवकर मंजुरीसाठी पाठविण्यात येतील.
तसेच शिक्षकांच्या सर्व प्रलंबित समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी सर्याम यांनी दिले.