बसपच्या सभेत संघटन बांधणीवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 09:42 PM2018-04-21T21:42:27+5:302018-04-21T21:42:27+5:30
बहुजन समाज पक्षाची तिरोडा-गोरेगाव व विधानसभा क्षेत्राची संघटन बांधणी सभा बुधवारी (दि. १८) प्रदेश सचिव दिनेश गेडाम, नवनियुक्त जिल्हाअध्यक्ष ध्रुवास भोयर, जिल्हा महासचिव व तिरोडा विधानसभा प्रभारी कमल हटवार, जिल्हा बी.व्ही.एफ.संयोजक उके तसेच तिरोडा विधानसभा अध्यक्ष भिमराव साखरे, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
एकोडी : बहुजन समाज पक्षाची तिरोडा-गोरेगाव व विधानसभा क्षेत्राची संघटन बांधणी सभा बुधवारी (दि. १८) प्रदेश सचिव दिनेश गेडाम, नवनियुक्त जिल्हाअध्यक्ष ध्रुवास भोयर, जिल्हा महासचिव व तिरोडा विधानसभा प्रभारी कमल हटवार, जिल्हा बी.व्ही.एफ.संयोजक उके तसेच तिरोडा विधानसभा अध्यक्ष भिमराव साखरे, महासचिव किरणकुमार मेश्राम, महासचिव हेमराज बागडे, महासचिव शैलेश उके, शहर अध्यक्ष निलेश रोडगे, शहर महासचिव आनंद मेश्राम यांच्या उपस्थितीत पार पडली.
सभेत नव्याने संघटन व बुथ बांधणी या विषयावर प्रदेश व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये उपस्थितांना पदाधिकाºयांना सेक्टर बांधणीची जवाबदारी देण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर फुले, शाहू, आंबेडकर व बहुजन समाजात जन्मलेल्या महापुरुषांच्या विचाराने हे शक्य होईल असे मत प्रदेश सचिव दिनेश गेडाम यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी ध्रुवास भोयर, कमल हटवार व दिपक हिरापुरे यांनी सुध्दा कार्यकर्त्याना समायोजित मार्गदर्शन केले. सभेला भूपेश सोनवाने, भारत भेलावे, शामराव मडावी, दिनेश रोकडे, अशोक बावणे, दिलदार रंगारी, महेंद्र बन्सोड, अनिल रंगारी, विक्की बडगे, मनोज दरबडे, विनोद जांभुळकर, संदीप वासनिक, अरुण गजभिये व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन भिमराव साखरे यांनी केले. आभार किरणकुमार मेश्राम यांनी मानले.