शिक्षक समितीची शिक्षण सभापतींशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:36 PM2018-03-26T22:36:10+5:302018-03-26T22:36:10+5:30
चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी शाळा सकाळपाळीत लावल्या जाते. परंतु यंदा विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खावेच लागणार अशी व्यवस्था प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे. सकाळ पाळीच्या नावावर सुरू केलेली शाळा आता दुपारी १२.१५ वाजता सुटत असल्याने विद्यार्थ्यांना भर उन्हात आपल्या घरी जावे लागणार आहे.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी शाळा सकाळपाळीत लावल्या जाते. परंतु यंदा विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खावेच लागणार अशी व्यवस्था प्राथमिक शिक्षण विभागाने केली आहे. सकाळ पाळीच्या नावावर सुरू केलेली शाळा आता दुपारी १२.१५ वाजता सुटत असल्याने विद्यार्थ्यांना भर उन्हात आपल्या घरी जावे लागणार आहे. या मुद्याला घेऊन महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण सभापती रमेश अंबुले यांच्याशी चर्चा केली.
जिल्हा परिषदेच्या १०६५ शाळांत दोन लाखांवर विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. आता उन्हाळ्याला सुरूवात झाल्याने जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी जिल्हा परिषद शिक्षण व क्रीडा समितीने १५ मार्च रोजी झालेल्या मासीक सभेत २१ मार्चपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळपाळीत सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २१ मार्च पासून सकाळ पाळीत शाळा सुरू करण्यात आली. परंतु सकाळी ७.१५ ते दुपारी १२.१५ ही वेळ ठरविण्यात आल्याने विद्यार्थ्यांना उन्हातान्हात शाळेबाहेर पडावे लागते.
चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हात बाहेर पडणे ही बाब कुणालाही पटणारी असल्याने महाराष्टÑ शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत, सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, उपाध्यक्ष किशोर डोंगरवार, सहसचिव संदीप तिडके व इतर पदाधिकाºयांनी शिक्षण सभापतींची भेट घेऊन चर्चा केली. सोबत शिक्षण विभागातील विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व सदस्याांनी या चर्चेत सहभाग घेतला होता.
यावेळी शिक्षण सभापती रमेश अंबुले यांनी अधिकाºयांशी चर्चा करून वेळेसंदर्भात तोडगा काढू असे शिक्षकांना आश्वासन दिले.