क्षयरोग पूर्णपणे बरा होणारा आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 08:55 PM2019-03-28T20:55:44+5:302019-03-28T20:56:05+5:30
भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकांना क्षयरोग जंतुचे संक्रमण झालेले आहे. त्यातील १० टक्के लोकांना त्यांच्या जीवनात क्षयरोगाची बाधा होत असते. तरी क्षयरोग होण्यापासून बचावर करायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देत सकस आहार व योग्य व्यायाम करुन स्वत:ची रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकांना क्षयरोग जंतुचे संक्रमण झालेले आहे. त्यातील १० टक्के लोकांना त्यांच्या जीवनात क्षयरोगाची बाधा होत असते. तरी क्षयरोग होण्यापासून बचावर करायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देत सकस आहार व योग्य व्यायाम करुन स्वत:ची रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे आहे. क्षयरोग हा कितीही गंभीर व जिवघेणा आजार असला तरी रूग्णाने प्रामाणिकपणे औषधोपचार घेतल्यास पूर्णपणे बरा होणारा आजार असल्याची माहिती संजय रेवतकर यांनी दिली.
जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजीत क्षयरोग मार्गदर्शन कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अर्पित पालेवार होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. महेश लोथे व रिजवाना शेख उपस्थित होते.
डॉ. लोथे यांनी, क्षयरोग होण्याची कारणे, लक्षणे व क्षयरोगाचे निदान कसे करता येईल याविषयी माहिती दिली. रुग्णांनी अर्धवट उपचार घेतल्यास एमडीआर-टीबी, एक्सडीआर-टीबी अशी प्राणघातक टी.बी. होत असल्याचे सांगितले. म्हणून रुग्णांनी पूर्वी उपचार करावा व प्रत्येक रुग्णाला दरमहा ५०० रुपये देण्यात येत असल्याचे सांगितले.
डॉ. पालेवार यांनी, क्षयरोगाची माहिती देत क्षयरोग शरीराच्या कोणत्याही भागाला होणारा आजार आहे. त्यात ८५ टक्के फुफूसाचा क्षयरोग व १५ टक्के फुप्फुसाव्यतिरिक्त क्षयरोग होत असल्याचे सांगितले. तसेच बचावात्मक उपाय व उपचारावर माहिती दिली. संचालन करून प्रास्ताविक शेख यांनी मांडले. आभार निलेश सांगोळकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी दृष्टी संस्था, ग्रामीण रुग्णालयातील रवी बघेल, अमित भिवसाने, मेश्राम, शेख यांनी सहकार्य केले.