भाजपप्रती जनतेचा मोहभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 09:22 PM2017-11-04T21:22:58+5:302017-11-04T21:23:09+5:30
जनता आता भारतीय जनता पक्षाच्या खोट्या आश्वासनांनी त्रस्त झाली आहे. आता त्यांना आपल्या क्षेत्रात विकास हवा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जनता आता भारतीय जनता पक्षाच्या खोट्या आश्वासनांनी त्रस्त झाली आहे. आता त्यांना आपल्या क्षेत्रात विकास हवा आहे. यामुळेच समझदार जनतेने भापजला त्यांची जागा दाखवून दिली. भाजप प्रती जनतेचा मोहभंग झाला असून कॉंग्रेस पक्षाला मिळालेले यश हेच त्याचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आयोजीत कार्यकर्ता संमेलन व नवनिर्वाचित सरपंच-सदस्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, कॉंग्रेसने जनतेला कधीही १५ लाख रूपये देण्याचे, एका शहीद जवानाच्या बदल्यात १० पाकीस्तानी जवानांना मारण्याचे खोटे आश्वासन दिले नाही. जीएसटी व नोटबंदी लावून जनतेला अडचणीत आणले नाही. पेट्रोल, सिलींडर, वीज दरवाढ करून जनतेच्या खिशांवर डल्ला मारला नाही. यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत ७० पैकी सुमारे ५० ग्रामपंचायतींवर कॉंग्रेस पक्षाचे ३० हून अधीक सरपंच व सुमारे ३०० सदस्य निवडून आले असल्याचे सांगीतले.
जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी, भाजन सरकार व भाजपच्या बडबोले नेत्यांप्रती जनता नाराज असून यामुळेच जनतेने कॉंग्रेसला पसंती दाखवून दिल्याचे मत व्यक्त केले. तर कॉंग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांनी, भाजप सरकार अयशस्वी ठरल्याने जनतेचा कल कॉंग्रेसकडे दिसून येत असल्याचे सांगीतले.
संचालन महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले. आभार तालुकाध्यक्ष प्रकाश् रहमतकर यांनी मानले.
कार्यक्रमाला के.आर.शेंडे, रामरतन राऊत, उषा शहारे, सहेसराम कोरोटे, नामदेव किरसान, अमर वºहाडे, विनोद जैन, प्रफूल अग्रवाल, राकेश ठाकूर, विमल नागपूरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, रमेश अंबुले, सिमा मडावी, शेखर पटेल, गिरीष विजय टेकाम, दपक पवार, लता दोनोडे, माधुरी कुंभरे, ज्योती वालदे, सरिता कापगते, माधुरी हरिणखेडे, हिरालाल फाफनवाडे, हेमलता डोये, धनलाल ठाकरे, स्नेहा गौतम, ओमप्रकाश भक्तवर्ती, चमन बिसेन, मनीष मेश्राम, प्रमिला करचाल, निता पटले, विनीता टेंबरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायनी धावडे, योगराज उपराडे, अनील मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे, पन्नालाल सहारे, संदीप रहांगडाले, पृथ्वीपालसिंह गुलाटी, अशोक लंजे, डॉ. योगेंद भगत, राधेलाल पटले, अशोक चौधरी, डोमेंद्र रहांगडाले, शेषराव गिरेपुंजे, संदीप भाटीया, टिनू पटेल यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
सरपंच व सदस्यांचा केला सत्कार
याप्रसंगी ग्राम धामनेवाडा सरपंच रजनी बोपचे, दांडेगाव सरपंच बेबीनंदा चौरे, खळबंदा सरपंच ज्योती कांबळे, कारंजा सरपंच धनवंता उपराडे, लंबाटोला सरपंच योगराम ठाकरे, दतोरा सरपंच उर्मिला महारवाडे, खातीया सरपंच सेवंता तावाडे, पांजरा सरपंच चेतन नागपूरे, रापेवाडा सरपंच जीवन चव्हाण, सिवनी सरपंच धुर्वराज उके, अंभोरा सरपंच चिंतामन चौधरी, बरबसपुरा सरंच गितावंती नागपूरे, टेमनी सरपंच खेलन टेकाम, बडेगाव सरपंच योगिता पाचे, कटंगीकला सरपंच प्रतिभा डोंगरवार, बिरसी सरपंच इंदू वंजारी, झिलमिली सरपंच राधीका कावडे, ढाकणी सरपंच नामदेव सहारे, जब्बारटोला सरपंच वच्छला चिखलोंडे, रतनारा सरपंच रेखा चिखलोंडे, दासगाव सरपंच रानू नशिने, बिरसी सरपंच शिला कुंजाम, मुरदाडा सरपंच दयाराम आगाशे, लहीटोला सरपंच दिनेश तूरकर, देवूटोला सरपंच रामेश्वर हरिणखेडे, सतोना सरपंच धनवंती मानकर, नवेगाव सरपंच मदनलाल सयाम, आसोली सरपंच भागरता धुर्वे यांच्यासह सदस्य तसेच अन्य कित्येक गावांतील सदस्यांचा सत्कार करण्यात आला.