तुमसर रोड रेल्वे स्थानकावर लागले डिस्प्ले
By Admin | Published: August 18, 2016 12:28 AM2016-08-18T00:28:36+5:302016-08-18T00:28:36+5:30
तुमसर रोड रेल्वे स्थानकावर मागील अनेक महिन्यांपासून प्रवाशी डब्बा निर्देशित करणारे डिस्प्ले बंद होते.
तुमसर : तुमसर रोड रेल्वे स्थानकावर मागील अनेक महिन्यांपासून प्रवाशी डब्बा निर्देशित करणारे डिस्प्ले बंद होते. जुने डिस्प्ले काढून नवीन डिस्प्ले लावण्याचे कामे सुरु आहे. १५ आॅगस्टला त्याची चाचणी घेण्यात आली. प्लॅटफॉर्म क्रमांक दोन तथा तीनवर हे डिस्प्ले लावण्यात येत आहे.
जुने डिस्प्ले मध्ये तांत्रिक बिघाडामुळे ते मागील अनेक महिन्यांपासून बंद होते. परंतु रेल्वे प्रशासनाने ते दुरुस्त केले नाही. उलट रेल्वे स्थानकावर आवक कमी असल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. या संदर्भात माजी आमदार अनिल बावनकर, रेल्वे समिती सदस्य संजय तांबी, देवसिंग सव्वालाखे, एम.डी. आलमखान, सरपंच रिता मसरके, प्रा. मोहन भोयर, नगरसेवक प्रमोद तितीरमारे, धनंजय सिंह, सुशिल बन्सोड, जिल्हा परिषद सदस्य खेमराज पंचबुद्धे, रमेश धोटे यांनी रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक व आमदार चरण वाघमारे यांना दिले होते.
रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अग्रवाल यांनी दखल घेऊन डिस्प्ले तातडीने लावण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले होते. त्यांच्या निर्देशानुसार १५ आॅगस्टला डिस्ल्पेची चाचणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी घेतली. येत्या आठ दिवसात हे डिस्प्ले प्रवाशांना सेवा पुरविणार आहे. (तालुका प्रतिनिधी)